नरेंद्र मोदींचा मुखवटा घालून सांगलीतील सभांमध्ये दिसणारी व्यक्ती आहे तरी कोण?

निवडणूक काळात सांगलीच्या सभांमध्ये एक व्यक्ती गेल्या दहा वर्षांपासून लोकांचं लक्ष्य(face mask) वेधून घेत आहे. नरेंद्र मोदी यांचा हुबेहुब आवाज आणि त्यांच्या सारखीच अॅक्शन सुद्धा या व्यक्तीकडून केली जाते. गेल्या १० वर्षांपासून नरेंद्र मोदी यांचा मुखवटा घालून सांगलीच्या तासगाव तालुक्यातील वासुंबे येथील संभाजी थिटे ही व्यक्ती अनेक सभांना हजेरी लावत आहे.

सांगली जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या अनेक सभांना संभाजी थिटे हजेरी लावत आहेत. गेल्या दहा वर्षापासून निवडणूक काळामध्ये संभाजी थेटे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुखवटा(face mask) घालून प्रचार सभांमध्ये सहभागी होतायेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुखवटा लावण्याबरोबरच ते मोदीच्या स्टाईल मध्ये डायलॉग देखील मारतात. मोदींचा हुबेहूब आवाज काढतात. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून त्यांचा चाहता असल्याचे देखील ते सांगतात.

हेही वाचा :

Amazon-Flipkart चा धमाकेदार सेल सुरू

‘होय, मी Cheat केलंय…’, समांथाच्या Ex पतीची कबुली

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन!