आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत रविवारी 23 जून रोजी (cricket)अफगाणिस्तान क्रिकेट टीमेनन ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी पराभव केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियावर सुपर 8 मधून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे. ऑस्ट्रेलियाने सुपर 8 मध्ये खेळलेल्या 2 पैकी 1 सामना जिंकला आहे. तर 1 गमावला आहे. तर अफगाणिस्तानच्या विजयामुळे सेमी फायनलच्या आशा वाढल्या आहेत. तर आता सुपर 8 मध्ये ए ग्रुपमधून सोमवारी 24 जून रोजी टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून सेमी फायनलमध्ये पोहचण्याची संघी आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट आहे. या स्पर्धेत अनेक सामने हे पावसामुळे रद्द करावे लागले आहेत. अशात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? असे प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडले आहेत.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचा हा सुपर 8 मधील तिसरा आणि शेवटचा सामना आहे. हा सामना सेंट लूसिया मैदानात होणार आहे. मात्र हवामान विभागानुसार, वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता पावसाची 51 टक्के शक्यता आहे. अशात या पावसाने आणखी काही वेळ बॅटिंग केली तर सामन्याचं काहीही होऊ शकतं.
सामना रद्द झाला तर काय?
सुपर 8 मधील सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस नाही. त्यानुसार टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया सामन्यासाठीही राखीव दिवस नाही. त्यामुळे सामना रद्द करण्यात आला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात येईल. टीम इंडियाचे अशाप्रकारे एकूण 5 गुण होतील. टीम इंडिया यासह सेमी फायनलसाठी पात्र ठरेल. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढेल.
ऑस्ट्रेलिया टीम: मिचेल मार्श (कॅप्टन), ॲश्टन आगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर आणि एडम झाम्पा.
टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
ही वाचा :
पावसामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी रद्द; अधीक्षकांनी दिली नवी तारीख
दक्षिण आफ्रिकेला क्लीन स्वीप, टीम इंडियाचा 6 विकेट्सने विजय
गव्हाच्या पिठापासून झटपट बनवा चविष्ट चिली गार्लिक पराठा