जून महिन्याच्या सुरुवातीलाच टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. 5 जूनला टीम इंडियाचा(rohit sharma) या स्पर्धेत पहिला सामना आयर्लंडशी होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वात लहान स्वरूपाचा पहिला वर्ल्डकप 2007 मध्ये खेळला गेला होता. या वर्ल्डकपचा विजेता भारत देश होता. त्यानंतर टीम इंडियाला T20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. त्यामुळे यावेळी भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जातोय. 2024 च्या T20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल ते जाणून घ्या.
काही रिपोर्ट्सच्या म्हणण्यानुसार, रोहित शर्मा(rohit sharma) आणि विराट कोहली 2024 च्या T-20 वर्ल्डकपमध्ये ओपनिंग करणार आहेत. मात्र तसं होणं शक्य नाही. याचं कारण म्हणजे यशस्वी जयस्वालचा टीममध्ये समावेश करण्यात आला असून रोहितसोबत यशस्वी ओपनिंगला उतरण्याची शक्यता आहे. यानंतर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
भारताचा मिस्टर 360 डिग्री आणि या फॉरमॅटचा सर्वोत्तम फलंदाज सूर्यकुमार यादव यावेळी चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे. यानंतर विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर तर स्टार हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर उतरू शकतो. टीम इंडियाचा स्पिनर रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावर खेळू शकतो.
गोलंदाजांमध्ये कोणाचा असेल समावेश?
गोलंदाजी डिपार्टमेंटमध्ये कुलदीप यादव लीड स्पिनरच्या भूमिकेत दिसणार आहे. वेस्ट इंडिजच्या पिचवर कर्णधार रोहित तीन स्पिनर्स खेळवण्याचा विचार गेल्यास युझवेंद्र चहलचाही अंतिम अकरामध्ये समावेश होऊ शकतो. तर वेगवान गोलंदाजीत अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांचा टीममध्ये समावेश होऊ शकतो.
टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग/युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
रिझर्व प्लेयर्स – शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद आणि आवेश खान.
हेही वाचा :
ऍम्ब्युलन्स खरेदी कंत्राट मिंधे सरकारच्या अंगलट
सैनी सरकार काँग्रेसने पाडावे, आम्ही मदतीला तयार