गुढीपाडवा(gudipadwa) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा सण आहे. हिंदू धर्मातला पहिला सण असून या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून हिंदू नववर्ष साजरे केले जाते.
यंदा गुढीपाडव्याचा(gudipadwa) शुभ मुहूर्त हा ९ एप्रिल २०२४ ला आहे. या दिवसापासून चैत्र नवरात्री सुरु होते. महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण हा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो.
गुढीपाडव्याला संवत्सर पाडवो, उगादी म्हणूनही ओळखले जाते. यादिवशी नवीन वस्तूंची खरेदी, नवा व्यवसाय, वास्तूशांती, गृहप्रवेश, लग्न आणि इतर अनेक शुभ कार्य केले जातात. महाराष्ट्रातील अनेक घराच्या दरात गुढी उभारली जाते. दारात उभारलेल्या गुढीचे विजय आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते.
गुढीपाडव्याला कर्नाटक आंध्रप्रदेशामध्ये युगादी किंवा उगादी या नावाने साजरा केले जाते. पडव, पाडवो या संस्कृत शब्दाचा मराठी अपभ्रंश ”पाडवा”. या शब्दाचा मराठी अर्थ चंद्राची कला. चैत्रशुद्ध प्रतिपदेनंतर चंद्र कलेकलेने वाढतो म्हणून याला चैत्रपाडवा असे देखील म्हटले जाते.
गुढी म्हणजे ध्वज आणि प्रतिपदेच्या तिथीला पाडवा म्हणतात. तसेच हा दिवस सुगीच्या दिवसाचे प्रतिकही मानले जाते. यादिवशी भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाची पूजा केली जाते. हा सण विशेषत: कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशात साजरा केला जातो.
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त
यंदा गुढीपाडवा ९ एप्रिल २०२४ ला साजरा केला जाणार आहे. परंतु, गुढीपाडव्याची प्रतिपदा तिथी ८ एप्रिल २०२४ रोजी रात्री ११.५० वाजता सुरु होईल आणि ९ एप्रिल २०२४ ला रात्री ८.३० वाजता समाप्त होईल.
गुढीपाडव्याचे महत्त्व
पौराणिक कथेनुसार, गुढीपाडव्याचा दिवस विश्वाची निर्मिती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय घुसखोरांचा युद्धात पराभव केला होता. असे म्हणतात की, गुढीपाडव्याच्या दिवशी वाईट गोष्टींचा अंत होतो. तसेच जीवनात सुख -समृद्धी येते.
पौराणिक कथेनुसार रामायण काळात दक्षिण भारत सुग्रीवचा मोठा भाऊ याच्या जुलमी शासनाखाली होता. माता सीतेचा शोध घेत असताना जेव्हा श्री राम सुग्रीवाला भेटले तेव्हा त्यांना बळीच्या अत्याचाराची माहिती मिळाली. त्यानंतर प्रभू रामाने बळीचा वध करुन तेथील लोकांना अत्याचारापासून मुक्त केले. तो दिवस गुढीपाडव्याचा होता.
हेही वाचा :
इचलकरंजीतील कुख्यात ‘केसरी गँग’चे तिघे गुंड जिल्ह्यातून हद्दपार
स्वाभिमानी शेतकरी संघटना सहा जागा लढविणार, राजू शेट्टी आजही ठाम
देवेंद्र फडणवीसच तिन्ही पक्ष चालवतात? CM एकनाथ शिंदे म्हणाले ‘दुसरं काही काम….’