कदमबांडे यांना आत्ता येण्याची वेळ का आली? सतेज पाटलांनी थेट सांगितले…

“आमदार राजवर्धन कदमबांडे एका बाजूला म्हणतात, आमचा हा घरगुती(time) विषय,आमचं आम्ही बघून घेऊ. मात्र कदमबांडे यांना आत्ताच कोल्हापूरमध्ये येण्याची वेळ का आली. मुळात भाजपने त्यांना अगदी खास विमान पाठवून, चार्टर विमान पाठवून त्यांना आणण्याची वेळ आली. भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मुद्दा त्यांच्याकडे कुठलाही राहिलेला नाही. म्हणून जुना कुठला तरी विषय उकरून काढायचा आणि लोकांची दिशाभूल करायची हे काम भाजपचे सुरू आहेत,” असा आरोप काँग्रेसचे नेते, आमदार सतेज पाटील यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती(time) राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई असतील या महामानवांबद्दल नकारात्मकता बनवून इतिहास बिघडवायचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी केला. ते कोल्हापूर गांधी मैदान येथे होणाऱ्या राहुल गांधी यांच्या सभेनिमित्त पाहणीदरम्यान आल्यानंतर बोलत होते.

“छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा विचार दिल्लीत पोहोचला पाहिजे ही सामान्य माणसाची विचारधारा आहे. मात्र, मुख्यमंत्री सर्व सोडून कोल्हापुरात बसले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचारांना विरोध ते का करत आहेत? असा सवाल सतेज पाटील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात होत असलेल्या सभावरून बोलताना, महाराष्ट्राबद्दल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला कॉन्फिडन्स नाही. म्हणूनच पाच टप्प्यात या निवडणुका घेतल्या जात आहेत. निवडणूक होईपर्यंत अजून दहा वेळा पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येतील, अशी चर्चा आहे, असा टोला सतेज पाटलांनी लगावला.

राज्यातील नेत्यांवर कॉन्फिडन्स राहिला नाही, राज्यातील नेतृत्व यश आणण्यास कमी पडत आहेत. ही खात्री झाल्यानेच मोदी महाराष्ट्रात आहेत. मात्र, ते आले तरी काही फरक पडणार नाही. महागाई, बेरोजगारी आणि घटना बदलण्यासंदर्भात भाजपच्या नेत्यांची वक्तव्यं यामुळे जनतेचा कौल महाविकास आघाडीसोबत असल्याचा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

“पोलिसांनो! जे करायचं ते करा”; राजू शेट्टी भडकले

Live कॉन्सर्ट थांबवून अरिजीत पाकिस्तानी अभिनेत्रीला म्हणाला Sorry!

PM मोदींच्या सभेने काही फरक पडणार नाही, कोल्हापुरकरांचा निर्णय पक्का