बिहारमधील किशनगंज येथे एका संतापजनक घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले आहे. एका क्षुल्लक कारणावरून नवऱ्याने स्वतःच्या पत्नीचा जीव घेतला. पत्नीने(Wife) स्वयंपाक करताना भाजी केली नाही, या कारणावरून संतापलेल्या नवऱ्याने तिला कुऱ्हाडीने सपासप वार करून ठार मारले. आरोपीने स्वतःहून पोलिसांकडे जाऊन गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

घटनास्थळी उडाली खळबळ
ही धक्कादायक घटना तारा बाडी ग्रामपंचायत परिसरात घडली. मृत महिला रूबी बेगम हिचे चार अपत्य असून, तिच्या मृत्यूनंतर ती सर्व मुले पोरकी झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच गंदर्भा डांगा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला.
कौटुंबिक वाद ठरला जीवघेणा
आरोपी अब्दुस शकूर आणि त्याची पत्नी रूबी बेगम यांच्यात सतत वाद होत असल्याचे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले. क्षुल्लक कारणांवरून दोघांमध्ये नेहमीच तणाव निर्माण होत असे. गुरुवारी रात्री अशाच एका भांडणात नवऱ्याने संतापाच्या भरात कुऱ्हाडीने पत्नीवर(Wife) सपासप वार केले. त्यामुळे रूबीचा जागीच मृत्यू झाला.
नवऱ्याची स्वखुशीने पोलिसांत कबुली
हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील चौकशी सुरू केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, स्थानिक लोकांनी या अमानुष कृतीचा निषेध व्यक्त केला आहे.
कौटुंबिक हिंसाचाराचा गंभीर प्रश्न
या घटनेमुळे कौटुंबिक हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. छोट्या-छोट्या कारणांमुळे उग्र रूप धारण करणाऱ्या वादांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. प्रशासनाने आणि समाजाने अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे.
हेही वाचा :
भाजप आमदाराच्या मुलाचा आयुष्य संपण्याचा प्रयत्न, प्रकृती गंभीर
अभिनेता गोविंदाच्या घटस्फोटाबद्दल सर्वात मोठी अपडेट, पत्नी सुनिता आहुजा म्हणाली…
नाचणी ओट्सचा वापर करून सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा खमंग कॅल्शियमयुक्त ढोकळा, वजन राहील नियंत्रणात