ऐकावं ते नवलंच! बीडमधून एक महत्वाची बातमी समोर आलीय. बायकोने(Wife) सासरी नांदायला यायला नकार दिला. त्यामुळं वैतागलेल्या नवऱ्यानं थेट आमरण उपोषण सुरू केलंय, अशी माहिती सेलूचे ग्रामविकास अधिकारी दिपक कच्छवा यांनी दिली आहे. आपण अजब या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.
सेलू येथे राहत असलेल्या तातेराव अभिमान बहिरे नावाच्या व्यक्तीनं आमरण उपोषण सुरू केलंय. यामागं एक धक्कादायक कारण आहे. वडिल, भाऊ आणि भावजयीच्या त्रासाला कंटाळून पत्नी(Wife) सासरी नांदायला येत नाही. त्यामुळे तातेरावने आज गावातील खंडोबा मंदिरातच आमरण उपोषण सुरू केलंय. तातेरावचा माजलगाव येथील लक्ष्मी नावाच्या महिलेशी विवाह झाला होता. 2002 साली त्यांचं लग्न झालं होतं.
या जोडप्याला चार मुली आणि एक मुलगा अशी अपत्ये आहेत. परंतु मागील काही दिवसापासून त्यांच्यात रोजच किरकोळ वाद होत होते. त्यामुळं तातेरावची पत्नी लक्ष्मी माहेरी गेली होती. बायको माहेरी गेल्यानंतर तातेरावच्या जेवणाची सोय लागत नव्हती. त्यामुळं तातेराव बहिरे महिनाभरापासून सेलू येथे आलाय. मेहुणे बायकोला नांदवायला पाठवत नाही, अशी तक्रार तातेराव बहिरे यांनी बीडच्या जिल्हाधिकारी आणि एसपी कार्यालयात केली होती.
या तक्रारीत म्हटलं होतं की, तक्रारीची दखल घेतली नाही तर सेलू गावातील खंडोबा मंदिरात आमरण उपोषणास आजपासून सुरूवात केलीय. मात्र तातेराव बहिरे यांनी उपोषणास बसण्याआधी ग्रामपंचायत कार्यालयामधून लेखी परवानगी घेतलेली नाही. तरीदेखील याप्रकाराबाबत तलवाडा पोलीस ठाणे आणि तहसिल कार्यालयामध्ये माहिती देण्यात येईल, असं सेलूचे ग्रामविकास अधिकारी दिपक कच्छवा यांनी दिलीय.
हेही वाचा :
‘या’ कारणामुळे तरुण मुलींच्या मानसिक आरोग्याला धोका
क्रिकेटर शिखर धवनचे ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबतचे स्विमिंग पूलमधील ‘ते’ फोटो व्हायरल
डिसेंबर महिन्यात जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; वार्षिक संकलनात 7.3 टक्क्यांनी वाढ