दिवंगत अभिनेते सुशांत सिंह राजपू याची मॅनेजर दिशा सालियन यांनी आत्महत्या केली होती. यानंतर दिशा सालियन प्रकरणासंदर्भात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. याचदरम्यान आता आदित्य ठाकरे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असा दावा(Claim) किशोर तिवारी यांनी केला आहे.

किशोर तिवारी हे आधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होते. काही दिवसांपूर्वीच किशोर तिवारी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीवेळी ठाकरेंसोबत होते.
दिशा सालियन यांनाी आत्महत्या केली नाही,त्यांचा जीव घेतला गेला. यामध्ये आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा दावा (Claim)राणे यांनी केला होता. अता किशोर तिवारी यांनी याप्रकरणात खळबळजनक दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेव्हा इच्छा होईल, तेव्हा आदित्य ठाकरे यांना अटक होईल, असे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने त्याच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये गळफास घेण्याच्या एक आठवडा आधी, मालाडमधील इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून सालियानचा मृत्यू झाला होता. यामुळे एक मोठा राजकीय वाद निर्माण झाला. ८ जून २०२० रोजी सॅलियन (२८) मृतावस्थेत आढळला. काही दिवसांनंतर राजपूत (३४) मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सालियनने मालाड येथील एका उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. तिचे वडील सतीश सालियन यांनी पोलिसांना पत्र लिहून म्हटले होते की त्यांना त्यांच्या मुलीच्या मृत्यूमध्ये कोणताही घातपात असल्याचा संशय नाही. त्यानंतर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती.
हेही वाचा :
पाकिस्तानपेक्षा चांगल तर…’ भारत पाक सामन्यापूर्वी इरफान पठाणने केलेल्या वक्तव्यामुळे क्रिकेट जगतात खळबळ
वयानुसार एका दिवसात किती बदाम खाणे आरोग्यासाठी फायदेशीर?; ‘ही’ आहे बदाम खाण्याची योग्य पद्धत
चहलकडून हवीये 60 कोटींची पोटगी? धनश्रीचे वकील सत्य सांगत म्हणाले, ‘या माध्यमातून धनश्रीची…’