आयसीसी टी20 वर्ल्डकप 2024 जिंकल्यानंतर(champions trophy) भारतीय संघाचे लक्ष आता पाकिस्तानात होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर आहे. मात्र, ही स्पर्धा पाकिस्तानात होणार असल्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानला जाणार का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड आणि भारत सरकारकडून अद्याप याबाबत कोणताही अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.
पाकिस्तानने जारी केले संभाव्य वेळापत्रक:
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) नुकतेच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे(champions trophy) संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. PCB च्या ड्राफ्टनुसार भारताचे सर्व सामने लाहोर येथे आयोजित केले जाणार आहेत. मात्र, भारतीय संघ पाकिस्तानात जाण्याची शक्यता फार कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांची माहिती:
आयसीसीच्या एका सूत्राने सांगितले की, “सध्या तरी आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही. भारतीय संघ पाकिस्तानात जाईल याची शक्यता फार कमी आहे. मात्र, याबाबतचा शेवटचा निर्णय हा भारत सरकारचा असणार आहे. या महिन्यात श्रीलंकेत आयसीसीची बैठक होणार आहे. या बैठकीत PCB हा मुद्दा उचलण्याची शक्यता आहे.”
सरकारचा निर्णय महत्त्वाचा:
सूत्राने पुढे म्हटले की, “अजून याबाबत आम्ही चर्चा केलेली नाही. सरकार जो काही निर्णय घेईल त्याचे आम्हाला पालन करावं लागणार आहे. ही आयसीसीची स्पर्धा आहे. त्यामुळे याबाबत आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. पुढच्या आयसीसी बैठकीत याबाबत चर्चा होऊ शकते. त्यावेळीच याबाबत काही माहिती समोर येईल.”
आशिया कप 2023 चा अनुभव:
गेल्यावर्षीचा आशिया कप देखील पाकिस्तानातच होता. मात्र, भारताने पाकिस्तानात न जाण्याचा निर्णय घेतल्याने हायब्रीड मॉडेलचा अवलंब केला गेला होता. भारताचे सर्व सामने आणि बाद फेरी श्रीलंकेत खेळवण्यात आले होते. भारतीय संघाच्या पाकिस्तानात जाण्याच्या निर्णयावर सर्वांची नजर लागून आहे. आगामी आयसीसी बैठक ही या मुद्द्याच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकते.
हेही वाचा :
अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात रणवीर-सलमान बेधुंद होऊन नाचले
50 वर्षापूर्वीची थरारक घटना मनाचा थरकाप उडवणारे मानवत नरबळी कांड…..!
शिवसेना नेमकी कुणाची? आता लवकरच होणार फैसला; सुप्रीम कोर्टातील सुनावणीची तारीख ठरली!