राज्याच्या राजकारणात आज अजित पवार गटाचे(political) खासदार सुनील तटकरे यांचं नाव चांगलंच चर्चेत आहे. तटकरेंनी शरद पवार गटाच्या खासदारांशी संपर्क साधून आमच्यासोबत या अशी ऑफर दिल्याची चर्चा आहे. या घडामोडीने राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे.
या घडामोडींवर आता शरद पवार(political) गटाकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत या अफवा कुणाकडून पसरवल्या जात आहेत याचा खुलासा केला आहे. तसेच कार्यकर्त्यांचं मनोबल कमी करण्यासाठीच अशा अफवा पसरवल्या जात असल्याचे आव्हाड म्हणाले आहेत.
तटकरेंच्या या ऑफरबाबत पत्रकारांनी विचारले असता आव्हाड म्हणाले, तटकरेंनी आमच्या खासदारांना फोन केलेले नाहीत. ते संसदेत खासदारांना भेटले होते. तुम्ही बापाला आणि मुलीला बाजूला ठेवा आणि आमच्याकडे या अशी ऑफर त्यांनी आमच्या पक्षाच्या खासदारांना दिली होती. त्यांचं काय चाललंय हेच कळत नाही. पक्ष घेतला ठीक आहे. निशाणी घेतली ठीक आहे. आता खासदार पळवा अन् वरती बोंबाबोंब करा की एकत्र येताहेत. एकत्र येताहेत. एकत्र येताहेत तर मग ह्यांना कशाला बोलावता असा सवाल आव्हाड यांनी विचारला.
आता हे सगळं कशासाठी सुरू आहे हे मला माहिती नाही. पण, एकदा शरद पवार साहेब बोलले की यात काही तथ्य नाही. अफवा पसरवल्या जात आहेत मग तुम्ही पत्रकार आम्हाला कशाला प्रश्न विचारता असा उलट सवाल आव्हाड यांनी केला. कार्यकर्त्यांचं मनोबल तोडण्यासाठी त्यांच्यात संभ्रम निर्माण करण्यासाठीच अशा अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवा भाजप आणि खासदारांना ऑफर देणारेच (सुनील तटकरे) लोक पसरवत आहेत असा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
ज्या खासदारांना फोन आले होते त्यातील कुणाशी तुमचं बोलणं झालं आहे का असे विचारले असता आव्हाड म्हणाले, माझं एका खासदाराशी बोलणं झालं आहे. पण इतकंच सांगतो की त्यांनी आमच्या खासदारांशी संपर्क केला होता. आमचे खासदार शंभर टक्के आमच्याबरोबरच आहेत याबद्दल माझ्या मनात कोणताच संशय नाही.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी आज थेट अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीवरून वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. याबाबत विचारले असता सुरेश धस यांनी जितके आरोप केले आहेत ते सगळे सत्य आहेत.
आता तर त्यांचंच सरकार आहे ना. युद्ध सुरू असतं तेव्हा असं समोरच्या सेनापतीला भेटायचं नसतं. राजकारण जरी असलं तरी मी जर उद्या त्यांच्या घरी जाऊन जेवण केलं तर लोकं संशय तर घेणारच ना, असे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.
हेही वाचा :
काँग्रेसला राम राम ठोकत पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत प्रवेश
पाकिस्तानने ‘या’ देशाला दिली एअरस्ट्राईकची धमकी; म्हटले, गरज पडल्यास हल्ला करू
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या भाविकांसाठी मोठी अपडेट, गाभाऱ्यातील प्राचीन शिळा..’