मराठा आरक्षणाचा निकाल येणार? ‘या’ दिवशी होणार सुनावणी

मुंबई: मराठा आरक्षणाबाबत(reservation) महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार आहे. येत्या ११ सप्टेंबरला मराठा आरक्षणासंदर्भात अंतिम निर्णय येऊ शकतो, अशी शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाची(reservation) न्यायालयीन लढाई सुरू आहे. पण गेल्या वेळी सर्वोच्च न्यायालात मराठा आरक्षण रद्द ठरवण्यात आले होते. त्यानंतरही राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या 11 सप्टेंबरला याचिकेवर न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी यासंदर्भत अपडेट दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द ठरवल्यानंतर विनोद पाटील यांनी फेरविचार याचिका दाखल केली होती. त्यावर 11 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालय मराठा आरक्षणावर अंतिम निर्णय देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनेक वर्षांपासून मराठा समाज न्यायाची वाट पाहत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. समाजाला कुणबी मराठा म्हणून मान्यता मिळण्याची होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर आता याबाबतची जबाबदारी असेल, त्याचं कारणही तसेच आहे. त्यांनी सत्ता मिळवण्यासाठी काय काय केल. त्याच प्रकारे ते मराठा समाजालाही न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत अशी अपेक्षा आहे, असे विनोद पाटील यांनी म्हटले आहे.

2019 साली मराठा समाजाला एसईबीसी हे शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण देण्यात आले. उच्च न्यायालयात ते वैध ठरवण्यात आले. पण सर्वोच्च न्यायालयाने मात्र मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालायात फेरविचार याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर आता 11सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

हेही वाचा:

इतिहासकार फडणवीस आणि जयंत पाटील

भाजपला धक्का; ‘हा’ नेता लवकरच करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

‘या’ राशींवर शनीदेवाचा आशीर्वाद; नव्या नोकरीसह होणार धनलाभ