छतावर स्टंट करणं तरुणाला पडलं महागात, जमिनीवर कोसळला अन्… Video Viral

सोशल मीडियावर दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज(Video) व्हायरल होत असतात. यात कोणी धक्कादायक स्टंट करताना दिसत तर कधी थरारक अपघात घडताना दिसून येतात. इथे काही हास्यापद व्हिडिओ देखील शेअर होत असतात.

सध्या एका थरारक स्टंटबाजीचा व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहे. यात एक व्यक्ती स्टंट करत असताना त्याच्यासोबत एक जीवघेणा अपघात घडून येतो मात्र विशेष म्हणजे पुढे काहीतरी भलतेच घडते. चला व्हिडिओत नक्की काय घडते ते सविस्तर जाणून घेऊयात.

एका धोकादायक स्टंटशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा एका उंच इमारतीच्या छतावर उभा राहून स्टंटबाजी करत आहे. सुरुवातीला तो बॅकफ्लिप मारायला तयार होतो, पण हवेत उडी मारताच त्याचा तोल ढासळतो आणि पुढच्याच क्षणी होत्याचे नव्हते होऊन बसते. हा स्टंट तरुणाला चांगलाच महागात पडतो मात्र तरीही त्याच्या अंगातली मस्ती काही कमी झाल्याचे दिसून येत नाही. व्हिडिओच्या शेवटी तो असे काही करतो की, पाहून तुम्हीही डोक्याला हाथ लावाल.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, व्हायरल व्हिडिओत तुम्हाला एक तरुण एका छतावर स्टंट करत उड्या मारताना दिसून येईल. आपल्या जीवाची पर्वा न करता हा तरुण छताच्या काठावर उभे राहून स्टंट करू पाहतो आणि शेवटी घडायचे तेच घडते. स्टंट करताना तो खूप वेगाने खाली आदळतो.

मुख्य म्हणजे, छताच्या खाली असलेल्या पत्र्याला चिरडत हा तरुण त्यातून खाली आदळतो, ज्यावरून आपण त्याला यामुळे किती दुखापत झाली असावी याचे अवमान लावू शकतो. हे दृश्य कोणत्याही व्यक्तीला भीतीने भरून टाकू शकते कारण त्याच्या पडण्याचा वेग इतका वेगवान होता की तो जगू शकणार नाही असे वाटत होते.

मात्र, व्हिडिओचा खरा शेवट इथे होत नाही तर व्हिडिओमध्ये खरा चमत्कार घडला जेव्हा तो मुलगा पडल्यानंतरही पुन्हा उभा राहिला. खाली पडल्यानंतर तरुण उभा राहून पुन्हा उड्या मारत खाली जमिनीवर पडतो, जे पाहून सर्वचजण शॉक होऊन जातात. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. लोक यातील दृश्ये पाहून यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

तरुणाच्या स्टंटबाजीचा हा व्हिडिओ @mr.haus_ji नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत तरुणाच्या स्टंटवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “आत्मा बाहेर आला आणि स्टंट करून गेला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे हा वाचला कसा”.

हेही वाचा :

जयंत पाटलांचा पत्ता कट होणार? राष्ट्रवादी हालचालींना वेग

BSNL ची ही सेवा लवकरच होणार बंद, लाखो युजर्सवर परिणाम!

शाहरुखनं लग्नाच्या 33 वर्षांनी मक्केला जात गौरी खानचं धर्मपरिवर्तन केलं? Viral Photo मुळे खळबळ