रानडुकराच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी

धानोरा तालुक्यातील मुरूमगाववरून १० किमी अंतरावर असलेल्या अतिसंवेदनशील विभागातील केहकावाही मसाद या गावातील एका युवकावर रानडुकराने हल्ला(attack) केल्याने तो गंभीर जखमी झाला.


धानोरा (जि गडचिरोली) : धानोरा तालुक्यातील मुरूमगाववरून १० किमी अंतरावर असलेल्या अतिसंवेदनशील विभागातील केहकावाही मसाद या गावातील एका युवकावर रानडुकराने हल्ला (attack)केल्याने तो गंभीर जखमी झाला. हिरामण सावजी वड्डे (वय ३६) असे जखमीचे नाव असून ही घटना मंगळवार (ता. ९) दुपारी ४ वाजता घडली.

हिरामण वड्डे जंगलात चारोळी वेचत असताना एका रानडुकराने अचानक त्याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. त्याला डोक्यात, मांडीवर, चेहऱ्यावर. पाठीवर गंभीर स्वरूपात जखमा झाल्या आहेत. त्याला त्वरित मुरूमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यास आले. प्राथमिक उपचार वैद्यकीय अधिकारी डाॅ. उमेश धुर्वे व सहयोगी कर्मचारी संगीता चुधरी यांनी केले.

हेही वाचा :

सांगलीतून विशाल की चंद्रहार पाटील? तडजोडीस उद्धव ठाकरेंचा नकार, ‘मविआ’कडून आज घोषणा

मनोरंजन जोरदार, तुम्ही आहात का तय्यार ? एअरटेल एक्स्ट्रीम फायबरसोबत मिळेल शानदार एंटरटेनमेंट

२०२२ मध्ये वेगळं होण्याचा निर्णय, २ वर्षांनंतर घटस्फोटाचा अर्ज! धनुष- ऐश्वर्याबाबत मोठी अपडेट