‘‘गेली ६० वर्षे काँग्रेसने(congress) देशाला बुडविले आहे; पण नरेंद्र मोदी हे प्रत्येक क्षण देशासाठी काम करतात, त्यांच्या रक्ताच्या थेंबा थेंबात राष्ट्रभक्ती भरलेली आहे.
पुणे : ‘‘गेली ६० वर्षे काँग्रेसने(congress) देशाला बुडविले आहे; पण नरेंद्र मोदी हे प्रत्येक क्षण देशासाठी काम करतात, त्यांच्या रक्ताच्या थेंबा थेंबात राष्ट्रभक्ती भरलेली आहे. ही निवडणूक देशाला बदनाम करणारे राहुल गांधी विरुद्ध राष्ट्रभक्त मोदी अशी आहे,’’ अशी शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्ला चढवत मोदींवर स्तुतीस्तुमने उधळली
रेसकोर्सवरील सभेत शिंदे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘मोदी यांची कार्यपद्धतीने ‘प्राण जाए पर वचन न जाए’ अशी आहे. त्यांनी ३७० कलम हटवून कश्मीर भारतासोबत जोडला. राम मंदिर उभे केले. या
निवडणुकीत कमळ, घड्याळ आणि धनुष्यबाणाला केले जाणारे मतदान मोदी यांनाच मिळणार आहे. सभेला झालेली गर्दी पाहता जिल्ह्यातील चारही मतदारसंघात महायुती जिंकून चौकार मारणार आहे.’’
फडणवीस म्हणाले
पुणेकरांचे मोदीजींवर प्रेम
एकीकडे मजबूत महायुती, तर दुसरीकडे राहुल गांधी यांची २६ पक्षांची खिचडी आहे
मोदी महायुतीचे पॉवरफुल इंजिन असून सर्वसामान्यांच्या बोगी या इंजिनला जोडलेल्या
महाविकास आघाडीत राहुल गांधींच्या इंजिनला नेत्यांना त्यांच्या मुलांना बसवायचे आहे, सर्वसामान्यांची बोगी जोडलेली नाही
अजित पवार म्हणाले
निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी
मोदींनी १० वर्षांत स्वच्छ कारभार केला; भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही
निवडणुकीत जिल्ह्याची जबाबदारी मोठी, त्यामुळे मतभेद न ठेवता काम करा
संविधान बदलणे यासारखे मुद्दे उपस्थित करून विरोधक धादांत खोटे बोलत आहेत, असे काही होणार नाही
हेही वाचा :
“पोलिसांनो! जे करायचं ते करा”; राजू शेट्टी भडकले
PM मोदींच्या सभेने काही फरक पडणार नाही, कोल्हापुरकरांचा निर्णय पक्का
कदमबांडे यांना आत्ता येण्याची वेळ का आली? सतेज पाटलांनी थेट सांगितले…