अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मंगळवारी देशाचा अर्थसंकल्प (budget) 2024-25 सादर केला. यामध्ये अनेक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये कृषी उत्पन्न वाढविण्याच्या योजना, बिगर शेती व्यवसायासाठी मुद्रा लोन अंतर्गत वीस लाखाचे कर्ज, आणि तरुणांसाठी खास पीएफ योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.
तरुणांसाठी विशेष पीएफ योजना
देशात प्रथमच नोकरीत प्रवेश करणाऱ्या तरुणांसाठी सरकारने एक खास पीएफ योजना सादर केली आहे. या योजनेत, पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांच्या पीएफ खात्यात सरकारतर्फे 15 हजार रुपये थेट जमा केले जातील. या योजनेचा फायदा अंदाजे तीस लाख तरुणांना होण्याची शक्यता आहे. निर्मला सीतारमन यांनी सांगितले की, यामुळे रोजगाराला प्रोत्साहन मिळेल आणि तरुणांची आर्थिक स्थिती सुधारेल.
सरकारच्या नऊ प्राथमिकता
अर्थसंकल्पात (budget) सरकारने नऊ प्राथमिकता निश्चित केल्या आहेत:
- कृषी उत्पादन वाढविण्यावर भर
- रोजगार आणि कौशल्य विकास
- सर्वसमावेशक मनुष्यबळ विकास आणि सामाजिक न्याय
- मॅन्युफॅक्चरींग आणि सेवा क्षेत्र
- शहरी विकास
- ऊर्जा सुरक्षा
- शहरांचा विकास
- इन्फ्रास्ट्रक्चर
- इन्वोशन आणि रिसर्च एण्ड डेव्हलपमेंट
रोजगार आणि कौशल्य विकास
सरकारने रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी तीन नवीन योजनांची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. यात पीएफचा अतिरिक्च फायदा होणार आहे. सरकारतर्फे पहिल्यांदा वर्कफोर्सचा हिस्सा होणाऱ्या तरुणांच्या पीएफ खात्यात थेट 15 हजार रुपये जमा केले जातील.
मॅन्युफॅक्चरींग क्षेत्रात रोजगार
केंद्र सरकारला या योजनांमुळे देशात रोजगार वाढण्याची आशा आहे. त्यामुळे उत्पादन क्षेत्रातील तरुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. कौशल्य विकासासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी कंपन्यांना 2 वर्षांसाठी दरमहा 3,000 रुपयांची प्रतिपूर्ती रक्कम मिळेल. याचा फायदा 50 हजार लोकांना होईल.
नोकरदार महिलांसाठी वसतिगृहे
अर्थसंकल्पात (budget) नोकरदार महिलांसाठी विविध भागात वसतिगृहे बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे महिलांना कर्मचारी वर्गात सामील होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि त्यांची सुरक्षितता आणि आराम सुनिश्चित होईल.
हेही वाचा :
शिक्षणमंत्रींचं अजब स्पष्टीकरण: ‘वन्समोअरला मराठीत पर्यायी शब्द नाही…
2024-25 केंद्रीय अर्थसंकल्प: पगारदार वर्गासाठी मोठा दिलासा, नवीन कर स्लॅबमध्ये बदल
खुशखबर! आता सर्वसामान्यांना मिळणार हक्काचं घर…