Bajaj ने देशात अनेक उत्तम बाईक आणि स्कूटर ऑफर केल्या आहेत.(electric scooter) नुकतेच कंपनीने 2025 Bajaj Dominar 250 आणि Dominar 400 लाँच केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

भारतीय मार्केटमध्ये बाईक्सच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. (electric scooter) पूर्वी बाईक खरेदी करताना ग्राहक फक्त त्याच्या मायलेजकडे लक्ष देत असत. मात्र, आता ही स्थिती पूर्णपणे बदलली आहे. अनेक तरुण मंडळींचे स्वप्न असते की त्यांच्याकडे स्वतःची बाईक असावी, जी दिसण्यात दमदार आणि परफॉर्मन्समध्ये धमाकेदार असावी. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या बेस्ट लूक असणाऱ्या बाईक लाँच करत असतात. नुकतेच बजाजने सुद्धा 2025 Bajaj Dominar 250 आणि Dominar 400 लाँच केली आहे. या दोन्ही बाईकमध्ये अनेक उत्तम फीचर्स पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही बाईक बद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Dominar 400 ची किंमत 2,38,682 रुपये (electric scooter) ठेवण्यात आली आहे. तर Dominar 250 ची किंमत 1,91,654 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरूमनुसार बदलू शकते.
2025 Bajaj Dominar 400 मध्ये काय असेल नवीन?
Bajaj Dominar 400 मध्ये अनेक ॲडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहे. यात राईड-बाय-वायर टेक्नॉलॉजी आहे. आता बाईकला इलेक्ट्रॉनिक थ्रॉटल बॉडी देण्यात आली आहे, ज्यामुळे ॲक्सिलरेशन अधिक सुरळीत झाला आहे. यामुळे चांगले हँडलिंग आणि प्रतिसाद मिळतो. यासोबतच, चार रायडिंग मोड देखील देण्यात आले आहेत. रोड, रेन, स्पोर्ट आणि ऑफ-रोड. तुम्ही वेगवेगळ्या रस्त्यांनुसार मोड बदलू शकता. यात बॉन्डेड ग्लास एलसीडी डिस्प्ले आहे, ज्यावर सर्व आवश्यक माहिती स्पष्ट दिसते. नवीन एर्गोनॉमिक हँडलबार डिझाइन, इंटिग्रेटेड जीपीएस माउंट, ॲडव्हान्स्ड कंट्रोल स्विच सारखी फीचर्स देण्यात आली आहेत.
यावेळी डोमिनार 250 मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. यात डोमिनार 400 सारखे चार रायडिंग मोड्स आहेत, परंतु त्यात चार ABS राइड मोड्स आहेत. ते विशेषतः टूरिंगसाठी डिझाइन करण्यात आले आहे. त्याच वेळी, इतर सर्व फीचर्स डोमिनार 400 सारखेच आहेत.
कंपनी या दोन्ही बाईक्सबद्दल म्हणते की डोमिनार ही केवळ एक बाईक नाही, तर वास्तविक जगाच्या अनुभवांचा मार्ग आहे. त्यांच्या मते, प्रवास केवळ व्यक्तीला मजबूत बनवत नाही तर त्याचा दृष्टिकोन देखील विस्तृत करतो. भारतातील स्पोर्ट्स टूरिंगने एक नवीन उंची गाठावी या विचाराने बजाज डोमिनारचे नवीन मॉडेल्स डिझाइन करण्यात आले आहेत.
हेही वाचा :
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मोदी सरकार 4% महागाई भत्ता वाढवणार
भारतीय महिला संघ तिसऱ्या T20 सामन्यात कोसळला! इंग्लडने 5 धावांनी मिळवला विजय