धक्कादायक! अडीच हजार सरकारी महिला कर्मचारी निघाल्या लाडक्या बहिणी

राज्य सरकारच्या(government) महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अनेक गैरप्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. लाडकी बहीण योजनेत सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनीही लाभ घेतल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. या तक्रारींची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार 1 लाख 60 हजार 559 कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यात 2 हजार 652 महिला कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे.

या तक्रारींची चौकशी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने माहिती तंत्रज्ञान विभागाला 1 लाख 60 हजार कर्मचाऱ्यांचा डेटा दिला होता. यापैकी किती महिला कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला याची माहिती घेण्यात आली. यानंतर असे लक्षात आले की जवळपास 2652 महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा निधी जमा झाला आहे. या महिला कर्मचाऱ्यांनी ऑगस्ट 2024 पासून एप्रिल महिन्यांपर्यंत प्रत्येकी 13 हजार 500 रुपये घेतले आहेत. या सर्व महिलांना देण्यात आलेला निधी 3 कोटी 58 लाख रुपये इतका आहे.

सरकारने (government)लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेच्या आदेशात सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. तरी देखील सरकारी कर्मचाऱ्यांनी अर्ज भरले. लाभही घेतला. त्यामुळे या योजनेचा मूळ उद्देशच कुचकामी ठरू लागला आहे. आता पहिल्या टप्प्यात दीड लाख कर्मचाऱ्यांची तपासणी झाली आहे. आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची अशाच पद्धतीने तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

आता ज्या 2652 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला त्या कर्मचाऱ्यांकडून पैशांची वसुली केली जाणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून प्रत्येक विभागाला याबाबतचा आदेश लवकरच देण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

दरम्यान, ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत, संजय गाधी निराधार योजनेतून घेत असतील तर त्यांना त्या योजनेचे 1500 रुपये मिळत आहेत. त्यामुळे तसंही त्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत. ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना 1000 रुपये मिळत आहे आणि 500 रुपये लाडकी बहीण योजनेमधून मिळतील. हेच मूळ शासन निर्णयातही म्हटलं आहे.

हेही वाचा :

रवींद्र जडेजाला CSK च्या कर्णधारपदावरून का हटवण्यात आलं होतं? 3 वर्षांनी जडेजाने केला खुलासा

आज अनेक शुभ संयोग; ‘या’ 5 राशींवर बरसणार देवी लक्ष्मीची कृपा, अचानक होणार धनलाभ

सावधान! महाराष्ट्रात ‘या’ 11 जिल्ह्यांना जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा धोका