जर तुम्ही 6 लाखांच्या बजेटमध्ये किफायतशीर कारच्या शोधात असाल(budget) तर मग Maruti Suzuki Alto K10 तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.

आपली स्वतःची कार खरेदी करणं हा एक आयुष्यातील महत्वाचा आणि सुखद क्षण असतो. यात भारतीय ग्राहक नेहमीच बजेट फ्रेंडली कार्सच्या शोधात असतात. जर एखादी कार उत्तम मायलेज देत (budget)असेलच तर मग हमखास ग्राहकांचा त्या कारला उत्तम प्रतिसाद मिळतो. अशातच जर तुम्ही सुद्धा एका उत्तम आणि बजेट फ्रेंडली कारच्या शोधात असाल तर मग Maruti Suzuki Alto K10 तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरेल.
भारतीय मार्केटमध्ये जेव्हा जेव्हा सर्वात स्वस्त कारबद्दल बोलले जाते तेव्हा मारुती सुझुकी अल्टो K10 चे नाव सर्वात वर येते. जरी ही कार साइझच्या बाबतीत थोडी लहान असली तरी मायलेजच्या(budget) बाबतीत ही कार खूप पसंत केली जाते.
जर तुम्ही दैनंदिन ऑफिस प्रवासासाठी अल्टो खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी ठरू शकते. खरं तर, जुलै 2025 मध्ये मारुती अल्टोवर बंपर डिस्काउंट दिले जात आहेत.
दिल्ली-एनसीआरच्या स्थानिक डीलरशिपनुसार, अल्टो K10 च्या पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंटवर 62,500 रुपये, ऑटोमॅटिक व्हेरिएंटवर 67,500 रुपये आणि सीएनजी (मॅन्युअल) व्हेरिएंटवर 62,500 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. कॅश डिस्काउंट व्यतिरिक्त, कारमध्ये एक्सचेंज ऑफर आणि कॉर्पोरेट ऑफर्स देखील समाविष्ट आहेत.
किंमत किती?
मारुती सुझुकी अल्टो K10 ची एक्स-शोरूम किंमत 4 लाख 23 हजार रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी ही किंमत 6 लाख 21 हजार रुपये आहे. त्याच्या LXi S-CNG व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 5 लाख 90 हजार रुपये आहे.
कंपनीने मारुती सुझुकी अल्टो K10 मध्ये 1.0 लिटर 3 सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन 66 बीएचपीच्या कमाल पॉवरसह 89 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. यासोबतच, ही कार 5-स्पीड मॅन्युअल किंवा एएमटी गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
मारुती सुझुकी अल्टो किती मायलेज देते?
या कारमध्ये सीएनजीचा पर्याय देखील उपलब्ध आहे. कंपनीच्या मते, कारचा पेट्रोल व्हेरिएंट प्रति लिटर सुमारे 25 किमी मायलेज देतो. त्याच वेळी, या कारचा सीएनजी व्हेरिएंट 33 किमी पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे.
मारुती सुझुकीच्या या कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने या कारमध्ये एसी, फ्रंट पॉवर विंडो, पार्किंग सेन्सर, सेंट्रल कन्सोल आर्मरेस्ट, गियर शिफ्ट इंडिकेटर, अॅडजस्टेबल हेडलॅम्प, हॅलोजन हेडलॅम्प, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड सेफ्टी लॉक, ड्युअल एअरबॅग्ज अशा अनेक उत्तम सुविधा दिल्या आहेत.
हेही वाचा :
सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कोथिंबीर पराठा, नाश्ता होईल पोटभर
धबधब्याच्या काठावर उभा राहून गर्लफ्रेंडला प्रोपोज करत होता, तितक्यात पाय घसरला अन्…Video
‘…तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड’; दुकानदाराने सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं