फुल्ल टॅंकवर 700 KM ची रेंज ! लाँच होताच ‘या’ बाईकने दाखवला जलवा, फक्त 10 हजारात करता येईल बुक

नुकतेच मार्केटमध्ये एक अशी अफलातून बाईक लाँच झाली आहे, (market)जिने ग्राहकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. चला या बाईकच्या EMI आणि डाउन पेमेंटबद्दल जाणून घेऊयात.

भारतीय ऑटो बाजारात बाईकच्या विक्रीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. (market)यातही आता ग्राहकांच्या आपल्या बाईककडून असणाऱ्या अपेक्षा बदलत आहेत. पूर्वी बाईक खरेदी करताना अनेक ग्राहक त्याच्या मायलेज आणि किमतीकडे जास्त लक्ष द्यायचे. मात्र, आज ही स्थिती पूर्णपणे बदलेली आहे. आजच्या ग्राहकाला स्टायलिश लूक असणारी बाईक जास्त भावते. म्हणूनच तर अनेक ऑटो कंपन्या आकर्षक लूक असणाऱ्या बाईक लाँच करत आहेत.

नुकतीच भारतीय बाजारात Honda CB125 Hornet लाँच करण्यात आली आहे. ही बाईक अत्याधुनिक फीचर्ससह येते. जर तुम्ही ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पूर्ण पैसे देऊन खरेदी करणे आवश्यक नाही, ही बाईक EMI वर देखील खरेदी करता येऊ शकते. चला या बाईकच्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊया.

भारतीय बाजारात या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.12 लाख(market) रुपये आहे. जर तुम्ही ही बाईक तुम्ही राजधानी दिल्लीत खरेदी केली तर वाहनाची ऑन-रोड किंमत सुमारे 1 लाख 29 हजार रुपये असेल. यामध्ये आरटीओ चार्जेस आणि विमा रक्कम समाविष्ट आहे.

किती असेल EMI?
Honda CB 125 Hornet खरेदी करण्यासाठी तुम्हाला किमान 10 हजार रुपये डाउन पेमेंट म्हणून द्यावे लागतील. त्यानंतर, उर्वरित 1.20 लाख रुपयांसाठी तुम्हाला बाईक लोन घ्यावे लागेल. मात्र, कर्जाची रक्कम आणि डाउन पेमेंट तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असेल. जर तुम्हाला बाईकसाठी 9 टक्के व्याजदराने 9 वर्षांसाठी लोन मिळाले तर तुम्हाला दरमहा 4000 रुपये EMI भरावा लागेल.

डिझाइन आणि फीचर्स
Honda CB125 Hornet मध्ये शार्प टँक डिझाइन, स्प्लिट एलईडी हेडलाइट्स आणि गोल्डन यूएसडी फोर्क्स आहेत. ही बाईक चार स्टायलिश कलर्समध्ये उपलब्ध आहे. यात १२३.९४ सीसी इंजिन आहे जे 11.14 पीएस पॉवर आणि 11.2 एनएम टॉर्क निर्माण करते. ही बाईक 5-स्पीड गिअरबॉक्ससह येते आणि फक्त 5.4 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास स्पीड वाढवते. याचे वजन 124 किलो आहे, याचा ग्राउंड क्लीयरन्स 166 मिमी आहे आणि फ्युएल टॅंकची क्षमता 12 लिटर आहे.

होंडा बाईकमध्ये अनेक प्रगत वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. यात ४.२ इंचाचा टीएफटी डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, होंडा रोडसिंक अॅप, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, यूएसबी टाइप-सी चार्जर, सिंगल चॅनेल एबीएस, गोल्डन यूएसडी फोर्क्स आणि ५-स्टेप अॅडजस्टेबल मोनोशॉक आहे. बाईकमध्ये १२-लिटरचा इंधन टाकी आहे, जो भरल्यावर ७०० किमी पर्यंत प्रवास करू शकतो.

हेही वाचा :

आनंदवार्ता, सलग पाचव्यांदा गॅस सिलेंडर स्वस्त; तुमच्या शहरातील भाव जाणून घ्या
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! रक्षाबंधनापूर्वी महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार?
दररोज दही खाणे आरोग्यावर परिणाम करू शकतात का? ‘ही’ 5 तथ्ये तुमचा संभ्रम करतील दूर