मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक असलेल्या आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांनी चाहत्यांना मोठा धक्का देणारा निर्णय जाहीर केला आहे. गेली 15 वर्षे एकत्र संसार केलेल्या या दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असून, सोशल मीडियावर संयुक्त पोस्ट शेअर करत त्यांनी ही माहिती दिली. (divorce) त्यांच्या या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. डिसेंबर 2011 मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या आदिनाथ आणि उर्मिलाने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, बराच विचार आणि सामंजस्याने त्यांनी पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांच्या मुलगी जिजा हिच्या संगोपनासाठी ते कायम एकत्र राहतील आणि पालक म्हणून सर्व जबाबदाऱ्या मिळून पार पाडतील.

मुलीसाठी कायम एकत्र राहणार संयुक्त पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “खूप विचार केल्यानंतर आम्ही, आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर, एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला तरी आमची मुलगी जिजा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आमचं सर्वस्व आहे. तिला प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा यासाठी आम्ही एकत्रितपणे तिचं संगोपन करत राहू.”(divorce) त्यांनी पुढे म्हटले की, एकत्र घालवलेल्या प्रत्येक क्षणाबद्दल आणि एकमेकांबद्दल त्यांच्या मनात कायम आदर राहील.माध्यमांना केली खास विनंती पोस्टमध्ये आदिनाथ आणि उर्मिलाने चाहत्यांचे आणि माध्यमांचे आभार मानत त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याची विनंती केली आहे.
“आयुष्याच्या या नव्या टप्प्यावरही तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतील, अशी अपेक्षा आहे. कृपया आमच्या या वैयक्तिक निर्णयाचा आणि प्रायव्हसीचा आदर करावा. या विषयावर हेच आमचं एकमेव वक्तव्य असेल आणि यापुढे आम्ही कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांची जोडी मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानली जात होती. (divorce) त्यामुळे त्यांच्या विभक्त होण्याच्या निर्णयाने चाहते भावूक झाले असून, सोशल मीडियावर अनेकजण दोघांनाही पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
हेही वाचा :
पेट्रोल डिझेल स्वस्त झालं की महाग? वाचा आजचे लेटेस्ट रेट?