महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार? राज्यात फेरबदलांचे संकेत दिल्ली दौरे चर्चेत?

राज्याच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला असून, पुढील दीड महिन्यात राज्य आणि केंद्र स्तरावर महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (political) या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढलेल्या दिल्ली दौऱ्यांमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

दिल्लीतील हालचालींमुळे चर्चांना उधाण आगामी दीड महिन्यात केंद्र सरकार आणि महाराष्ट्राच्या राजकारणात काही महत्त्वाचे फेरबदल होऊ शकतात. या संभाव्य निर्णयांचा थेट परिणाम राज्याच्या सत्तासमीकरणांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (political) याच काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटींचे प्रमाण वाढल्याने या चर्चांना अधिक बळ मिळत असल्याचे बोलले जात आहे. २० जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून, या अधिवेशनानंतर केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता असल्याची mahiti समोर आली आहे. केंद्रातील संभाव्य फेरबदलांचा परिणाम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवरही होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे राज्यातील घडामोडींवरही सर्वांचे लक्ष लागले आहे.

फडणवीसांच्या नावाची चर्चा, अधिकृत संकेत नाहीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वारंवार होत असलेल्या दिल्ली दौऱ्यांचा संबंध या संभाव्य राजकीय फेरबदलांशी जोडला जात आहे. केंद्रातील घडामोडींमुळे महाराष्ट्रातही काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांच्या दिल्लीतील बैठका आणि भेटींवर राजकीय निरीक्षकांचे विशेष लक्ष आहे. (political) दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची केंद्रीय मंत्रिमंडळासाठीही चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या चर्चांबाबत फडणवीस यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा कोणतेही संकेतही दिलेले नाहीत. त्यामुळे पुढील काही आठवड्यांत केंद्र आणि महाराष्ट्रातील राजकारणात नेमके कोणते बदल घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

पेट्रोल डिझेल स्वस्त झालं की महाग? वाचा आजचे लेटेस्ट रेट?

कोल्हापूरच्या पर्यटनाला मिळणार नवी दिशा?

अन्न व औषध प्रशासनाचा धाडींचा सपाटा?