कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपकेच्या आंदोलनाला मोठे यश आले. अमेरिकेतून(Dipke) भारतात येऊन काही दिवस होत नाहीत, तोवरच थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात अभिजीत दिपकेला यश आले. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टी आंदोलनाला बसली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी आग्रह धरला. सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे या आंदोलनाला बळ मिळाले. कॉकरोच जनता पार्टीला देशभरातून सपोर्ट मिळाला. फक्त जंतर मंतरच नाही तर देशभरात विद्यार्थी मोर्चे काढताना दिसले. जंतर मंतरवर आंदोलकांची संख्या जबरदस्त वाढत होती. 20 जुलै 2026 रोजी अभिजीत दिपके याच्या मार्गदर्शनाखाली संसदेवर मोर्चा काढण्यात आला. तिथेच हे आंदोलन चिघळले. त्यानंतरही आंदोलक ठाम होते. अखेर मोदी सरकारला कॉकरोच जनता पार्टीपुढे झुकावे लागले.

जेंनझींची आक्रमक भूमिका बघता सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला.(Dipke) यादरम्यानच आता अभिजीत दिपके याने त्याच्या कुटुंबियांना सतत फोन करण्याच्या मुद्द्यावर सुनावले आहे. घरच्यांचे सतत काळजीपोटी येणारे फोन यामुळे अभिजीत दिपके वैतागला आहे. अभिजीत दिपके याने म्हटले की, मी आता देशाचा मुलगा आहे, मी तुमच्या एकट्याचा मुलगा नाही.
मला सतत फोन करणे बंद करा. मला पूर्ण देश त्यांचा मुलगा मानतो. तुम्ही बघितले असेल की, ते लोक मला खायला देतात, पाणी पाजतात. सर्व लोक माझ्या आई वडिलांसारखेच आहेत. सर्वजण माझे बहीण भाऊ आहेत.(Dipke) अभिजीत दिपके याचे वडील म्हणाले की, अभिजीत याने असे काही करावे, ही आमची इच्छा नव्हती. पण मी त्याच्या सर्व निर्णयात त्याच्यासोबत असणार आहे.
हेच नाही तर अभिजीत दिपके याच्या वडिलांनी म्हटले की, अचानक कोणता फोन आला तरीही तो फोन उचलायला भीती वाटते, काही चुकीचे तर घडले नाही ना असा प्रश्न मनात येतो. अभिजीत दिपके याच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळाला. मोदी सरकारमधील हा पहिलाच राजीनामा ठरला. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात विद्यार्थ्यांनी मोठी आक्रमक भूमिका घेतली.
हेही वाचा :
झिम्बाब्वेविरुद्धचा सामना कुठे पाहता येणार? योग्य माहिती जाणून घ्या?