कॅन्सरवरील उपचारांनंतर इतकी बदलली हिना खान ओळखणंही कठीण?

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Hina Khan) यावेळी तिच्या कोणत्याही नव्या प्रोजेक्टमुळे नव्हे, तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तिच्या नव्या लूकमुळे. मुंबईतील एका कार्यक्रमात पापाराझींनी टिपलेल्या व्हिडीओमध्ये हिनाचं वजन पूर्वीपेक्षा वाढलेलं दिसत असून, हा बदल पाहून अनेक चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

काही महिन्यांपूर्वी हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते. या कठीण काळात तिने उपचारांसोबतच आपल्या चाहत्यांशी सतत संवाद ठेवला. सोशल मीडियावर पोस्ट आणि व्हिडीओद्वारे तिने उपचारांचा प्रवास, मानसिक संघर्ष आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न याविषयी खुलेपणाने सांगितले. (Hina Khan) उपचार सुरू असतानाही तिने काम थांबवले नाही. मात्र उपचारांचा परिणाम म्हणून तिच्या वजनात लक्षणीय वाढ झाल्याचे आता स्पष्टपणे दिसून येत आहे.कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केल्यानंतर हिनाने तिचा दीर्घकाळचा साथीदार रॉकी जयस्वालसोबत विवाह केला. जून २०२५ मध्ये दोघांनी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. या संपूर्ण संघर्षाच्या काळात रॉकीने प्रत्येक टप्प्यावर तिची साथ दिल्याचे हिनाने अनेकदा सांगितले आहे.

एका मुलाखतीत हिनाने कॅन्सरचे निदान झाल्याचा क्षण आठवत भावनिक अनुभव शेअर केला होता. तिने सांगितले की, रिपोर्ट्स पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यावरही तिने परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा निर्णय घेतला. संकटाच्या क्षणीही आयुष्याकडे आशावादी नजरेने पाहण्याची भूमिका तिने स्वीकारली आणि (Hina Khan) त्याच बळावर उपचारांचा प्रवास पूर्ण केला. ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘कसौटी जिंदगी की २’ आणि ‘बिग बॉस’सारख्या लोकप्रिय कार्यक्रमांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी हिना खान आता पुन्हा एकदा तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात करताना दिसत आहे. तिचा बदललेला लूक चर्चेचा विषय ठरत असला तरी, कॅन्सरवर मात करून नव्या उमेदीनं पुढे जाण्याच्या तिच्या प्रवासाचं अनेकांकडून कौतुक होत आहे.

हेही वाचा :

दिवसा होणार अंधार, ऑगस्ट महिन्यात मोठे सूर्यग्रहण, तब्बल इतके तास?

जंतर-मंतर चे ग्रहण सुटलं

नीटनंतर MPSC चा महत्वाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा, संपूर्ण राज्यात खळबळ?