भाजप कार्यालयावर बॉम्ब हल्ला देशात मोठी खळबळ?

पंजाबमधील संगरूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास हा हल्ला झाल्याची माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, (BJP) मात्र कार्यालयाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

देशभरात पेपरफुटीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेले असतानाच पंजाबमधून ही घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. (BJP) त्यानंतर संसदेच्या दिशेने मोर्चाही काढण्यात आला. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलनाचे वातावरण काहीसे निवळले असताना संगरूरमधील भाजप कार्यालयावरील हल्ल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी बीअरच्या बाटलीचा वापर करून पेट्रोल बॉम्ब तयार केला आणि तो भाजपच्या जिल्हा कार्यालयाच्या दिशेने फेकला. ही घटना रविवारी पहाटे सुमारे तीन वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. पेट्रोल बॉम्ब कार्यालयाच्या भिंतीवर आदळल्यानंतर फुटला आणि त्यानंतर कार्यालयाच्या परिसरात आग लागली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना कळवण्यात आले. या हल्ल्यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी कार्यालयाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली आणि तपास सुरू केला. संगरूरचे एसपी दविंदर अत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीअरच्या बाटलीचा वापर करून पेट्रोल बॉम्ब तयार करण्यात आला होता आणि तो कार्यालयावर फेकण्यात आला. या प्रकरणात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात आहे, (BJP) याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

या घटनेचा तपास सध्या सुरू असून हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक माहिती गोळा केली जात आहे. हल्ल्यामागील कारण काय होते, याचाही तपास केला जात आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि कोणाचीही गय केली जाणार नाही, असे एसपी दविंदर अत्री यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे तपासानंतर या हल्ल्यामागील नेमके कारण आणि आरोपींबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?

सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?

रोहित शर्मा रिटायर होणार? टीम इंडियाच्या कोचने दिल उत्तर?