इचलकरंजी महापालिकेच्या विशेष सभेवेळी भाजपातील दुफळी चव्हाट्यावर घनकचरा व्यवस्थापन अंदाजपत्रकाचा विषय एकमताने मंजूर?

इचलकरंजी महानगरपालिकेच्या सोमवारच्या विशेष सभेत घनकचरा व्यवस्थापन अंदाजपत्रकाचा विषय एकमताने मंजूर करण्यात आला. सत्तारुढ गटातील हाळवणकर समर्थक तसेच विराेधी शिवशाहू विकास आघाडीच्या नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकल्यामुळे सत्तारुढ गटात फूट पडल्याचे उघड झाले आहे.१५ जुलै राेजी झालेल्या स्थायीच्या बैठकीत हा विषय सत्तारुढ गटातील सदस्यांच्या विराेधामुळे ६ विरुध्द ९ अशा मतांनी टाळण्यात आला हाेता. (Ichalkaranji) याच विषयावर चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी साेमवारी सभा आयाेजित करण्यात आली हाेती.

या विषयावरुन सत्ताधारी भाजपा गटातच हाळवणकर आणि आवाडे अशी फूट पडल्याचे उघड झाले हाेते. हाळवणकर समर्थक नगरसेवक-नगरसेविकांनी स्वतंत्र पक्ष बैठक घेतली. सर्वच सदस्यांनी महानगरपालिकेत सुरु असलेला कारभार आणि आयुक्तांच्या मनमानीविरुध्द प्रतिक्रिया व्यक्त केल्या. चर्चेअंती विशेष सभेसाठी न जाण्याचा निर्णय घेतला. (Ichalkaranji) त्याचबराेबर विराेधी शिवशाहू विकास आघाडीच्या नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला. सभागृहात आवाडे गटाचे २४ सदस्य उपस्थित असल्याने महासभेच्या नियमानुसार विषयाच्या वाचनानंतर हा विषय एकमताने मंजूर करण्यात आला.सभेच्या पार्श्वभूमीवर विराेधी शिवशाहू विकास आघाडीच्या नगरसेवकांनी गटनेता उदयसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली सभागृहाच्या पायरीवर बसत सत्तारुढ गटाची कामकाज पध्दती आणि आमदारांच्या प्रत्येकी गाेष्टीत हस्तक्षेपाचा निषेध नाेंदवत जाेरदार घाेषणाबाजी केली. पाटील यांनी आजची विशेष सभा बेकायदेशीर आहे. आर्थिक विषयाला मंजूरी देण्याचा अधिकार हा स्थायी समितीला असताे.

एखाद्या आपत्तकालीन प्रसंगात किंवा स्थायी समितीच्या किमान चार सदस्यांनी मागणी केल्यास असा विषय महासभेसमाेर आणता येताे. महासभेला काेणताही अधिकार नसताना महापाैर उदय धातुंडे यांच्याकडून आपल्या पदाचा गैरवापर करत शहरवासियांच्या निधीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला जात आहे.आजच्या या विषयावरुन सत्तारुढ गटातच दुफळी पडल्याचे उघड झाले आहे. (Ichalkaranji) त्यांच्यात काहीही अलबेल नसल्याचे सांगितले. आजच्या या महासभेच्या विराेधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. नगरसेवक संजय तेलनाडे, सचिन राणे आदींनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या विषयासंदर्भात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती हाळवणकर समर्थक माजी उपनगराध्यक्ष सुनिल महाजन यांनी दिली.

स्थायी समितीचे सभापती सतिश मुळीक, सदस्य रवी रजपुते, नितेश पाेवार, सुशांत कलागते व धु्रवती दळवाई यांनी मागणी केल्यानुसारच आजची विशेष सभा बाेलविण्यात आली हाेती. या सभेचे कामकाज नियमानुसारच झाल्याचे महापाैर धातुंडे यांनी सांगितले. भाजपात काेणीतही गटबाजी नसल्याचे स्पष्ट करत केवळ पाच सदस्यांनी विराेध केला म्हणजे ताे भाजपाचा विराेध हाेत नाही. इंदाैरच्या धर्तीवर इचलकरंजी शहराची स्वच्छता करण्याचा मानस आहे. आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ताे पूर्ण करणार असल्याचे सांगितले. २२ काेटी रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकात काेणत्याही प्रकारचा फुगवटा नसून वेगवेगळ्या कामाचे एकत्रिकरण करण्यात आले आहे. विराेधांचे काहीच चालत नसल्याने त्यांच्याकडून निरर्थक आराेप केले जात असल्याचेही महापाैरांनी सांगितले. गटनेते विठ्ठल चाेपडे, सतिश मुळीक ,नगरसेवक उपस्थित हाेते.

हेही वाचा :

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?

सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?

रोहित शर्मा रिटायर होणार? टीम इंडियाच्या कोचने दिल उत्तर?