सरकारला घाम फुटणार CJP मोठ्या आंदोलनाच्या तयारीत? नवा प्लॅन काय?

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीनं मोठं आंदोलन उभा केलं होतं, या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आता समोर आलेल्या माहितीनुसार सीजेपीकडून देशात नवं आंदोलन उभारलं जाण्याची शक्यात आहे.

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने दिल्लीमधील जंतर मंतरवर तब्बल एक महिना आंदोलन करण्यात आलं, संसदेवर मोर्चा देखील काढण्यात आला. कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, (Dharmendra Pradhan) दरम्यान आता या आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टी मोठा प्लॅन करण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी चर्चा केली असून, सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही, परंतु एकीकडे शेतकरी नेत्यांकडून अमेरिका आणि भारत ट्रेड डिल विरोधात मोठं आंदोलन उभारण्याची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे ही बातमी समोर आल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे, त्यामुळे या भेटीचं महत्त्व वाढलं आहे.

इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार या बैठकीमध्ये सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांच्यासोबतच काही नेते देखील सहभागी झाले होते. भारतीय किसान युनियनचे प्रमुख राकेश टिकैत (Dharmendra Pradhan) यांच्यासोबत त्यांची बैठक पार पडली. या बैठकीबाबत बोलताना सीजेपीची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आम्ही भविष्यातील रणनीतीवर चर्चा केली, या निमित्ताने किसान यूनियन आणि सीजेपीला एका मंचावर आणण्याचा आमचा उद्देश होता, असं सीजेपीच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या बैठकीबाबत बोलताना रांका यांनी असं म्हटलं आहे की, आम्हाला अशी आशा आहे की, शेतकरी आणि देशातील तरुण मोदींना चहुबाजुंनी घेरण्याचं काम करतील.

भारत आणि अमेरिकेमध्ये एक मोठी ट्रेड डील होणार आहे, या व्यापारी कराराला विरोध करण्यासाठी दिल्लीमध्ये ‘किसान महापंचायत’चं’आयोजन करण्यात आलं होतं. या महापंचायतमध्ये सहभागी होण्यासाठी शेकडो शेतकरी दिल्लीकडे निघाले होते, परंतु हरियाणा पोलिसांनी या शेतकऱ्यांना बॉर्डवरच अडवलं, परंतु आम्ही आता लवकरच नवी रणनीती तयार करू अशी प्रतिक्रिया आंदोलक शेतकऱ्यांनी त्यावेळी दिली होती. (Dharmendra Pradhan) दरम्यान भारतीय किसान युनियनच्या वतीने भारत आणि अमेरिकेच्या ट्रेड डीलला विरोध करण्यासाठी मोठं आंदोलन उभारलं जाण्याची शक्यता आहे, या आंदोलनात सीजेपी देखील सहभागी होणार का? हे अजून स्पष्ट नाही, मात्र सीजेपीच्या नेत्यांनी टिकैत यांची भेट घेतल्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.

हेही वाचा :

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर शरद पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया म्हणाले?

बदली, मानधनी १,१९८ कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेचा निर्णय लांबणीवर?

सांगलीत साखरे सोबत गूळाच्या दरातही वाढ?