कारगिल विजय दिनानिमित्त सांगलीत अभाविप तर्फे ३०० फूट तिरंगा पदयात्रा?

सांगली कारगिल युद्धात मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारतीय सैन्याच्या शूर वीरांना कृतज्ञ (Sangli) अभिवादन करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सांगली महानगरच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त ३०० फूट भव्य तिरंगा पदयात्रेचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते.

विश्रामबाग येथील हनुमान मंदिर (विलिंग्डन महाविद्यालय शेजारी) येथून भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व वीर जवानांना अभिवादन करून पदयात्रेला प्रारंभ झाला. हातात ३०० फूट लांबीचा तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या युवकांनी भारत माता की जय, वंदे मातरम्, भारतीय सेना अमर रहे, जय जवान-जय हिंद अशा राष्ट्रभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला.पदयात्रा विश्रामबाग येथून जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे विश्रामबाग चौक व पुन्हा हनुमान मंदिर येथे दाखल झाली. (Sangli) मार्गावर अनेक नागरिकांनी पदयात्रेवर पुष्पवृष्टी करून सहभागींचे स्वागत केले. अनेक ठिकाणी नागरिकांनी तिरंग्याला मानवंदना देत भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम केला.कारगिल विजय दिन हा केवळ एक स्मृतिदिन नसून भारतीय सैनिकांच्या अदम्य धैर्य, पराक्रम, राष्ट्रनिष्ठा आणि सर्वोच्च बलिदानाची प्रेरणा देणारा दिवस आहे.

देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता लढणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता व देशसेवेची भावना दृढ करणे हा या भव्य तिरंगा पदयात्रेचा प्रमुख उद्देश असल्याचे अभाविप जिल्हा संयोजक केतन शेंडगे यांनी सांगितले. (Sangli) यावेळी आमदार सुधीर दादा गाडगीळ , भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा स्वाती खाडे, सामाजिक कार्यकर्ते जयदीप पाटील तसेच मान्यवरांनी कारगिल युद्धातील वीर जवानांच्या शौर्यगाथा स्मरण करून त्यांच्या बलिदानाला ठिकठिकाणी अभिवादन केले व तिरंगा पदयात्राचे स्वागत केले.या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती जिल्हा प्रमुख प्रा. डॉ. जान्हवी बेडेकर, जिल्हा संयोजक केतन शेंडगे, महानगर अध्यक्ष प्रा. डॉ. सिद्धेश्वर जाधव, महानगर मंत्री अविनाश यादवाडे, व कार्यकर्ते तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर शरद पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया म्हणाले?

बदली, मानधनी १,१९८ कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेचा निर्णय लांबणीवर?

सांगलीत साखरे सोबत गूळाच्या दरातही वाढ?