भिवंडीत धाडकन कोसळली इमारत दुर्दैवी दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू?

भिवंडी शहरातील नारपोली परिसरात चार मजली धोकादायक इमारत अचानक कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून (building) काही नागरिक अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफ आणि विविध बचाव यंत्रणांकडून घटनास्थळी युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू आहे.

भिवंडी महापालिका हद्दीतील नारपोली गंगाराम वाडी परिसरात गुरुवारी रात्री सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ‘कोहिनूर’ नावाची चार मजली इमारत महापालिकेने यापूर्वीच धोकादायक घोषित केली होती. रात्री अचानक इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. इमारत कोसळताच (building) अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले आणि मदतीसाठी आर्त हाका सुरू झाल्या. माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आणि तातडीने बचाव मोहीम सुरू करण्यात आली. रात्रभर तसेच सकाळपर्यंत एनडीआरएफच्या पथकांसह बचाव यंत्रणा ढिगारा हटवून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेत आहेत. गेल्या 10 ते 11 तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या या मोहिमेदरम्यान अनेकांना बाहेर काढण्यात आले, मात्र काहींना जीव गमवावा लागला. मृतांची संख्या वाढून आता 8 वर पोहोचली असून आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने शोधकार्य अधिक वेगाने सुरू ठेवण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना तळमजल्यावरील काही पिलर हलवण्यात आले आणि त्यानंतर संपूर्ण इमारत अचानक कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही इमारत आधीच रिकामी करण्यात आली होती. मात्र काही रहिवासी आपले सामान आणि घरगुती साहित्य बाहेर काढण्यासाठी आत गेले होते. त्याचवेळी इमारत कोसळल्याने ते ढिगाऱ्याखाली अडकले. सुरुवातीला तीन ते चार जण अडकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, पण नंतर हा आकडा अधिक असल्याचे स्पष्ट झाले. धूळ, सिमेंट आणि काँक्रीटच्या मोठ्या ढिगाऱ्यातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दुर्घटनेनंतर सुमारे 12 तासांनी एनडीआरएफने आठवा मृतदेह बाहेर काढला. (building) सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील आयजीएम सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अजूनही काही कामगार आणि नागरिक अडकल्याची भीती असल्याने एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमन दल आणि भिवंडी महापालिकेचे कर्मचारी संयुक्तपणे शोध व बचावकार्य राबवत आहेत.

हेही वाचा :

कर्मचाऱ्याचा ऑनड्युटी खून?

2 मिनिटांत सोलून होईल लसूण, फक्त सोप्या ट्रिक्सचा करा अवलंब?

अनिल परब यांना मोठा दिलासा, मारहाण प्रकरणातून निर्दोष मुक्तता?