भारतीय क्रिकेटचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Indian) अनेक माजी आणि विद्यमान क्रिकेटपटूंनी त्याच्या कारकिर्दीचे कौतुक केले असून भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने मध्यरात्री सोशल मीडियावर भावनिक संदेश शेअर करत आपल्या दीर्घकाळच्या सहकाऱ्याला खास शुभेच्छा दिल्या.

जवळपास दोन दशकांहून अधिक काळ भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर अजिंक्य रहाणेने इन्स्टाग्राम वर एक भावनिक व्हिडिओ पोस्ट करत सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या घोषणेनंतर क्रिकेटविश्वातून त्याच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले. त्यानंतर मध्यरात्री सुमारे 1 वाजता रोहित शर्माने एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रहाणेसाठी खास पोस्ट लिहिली.
रोहितने आपल्या संदेशात म्हटले की, रहाणेची मेहनत, खेळाप्रती असलेले समर्पण आणि व्यावसायिक दृष्टिकोन यामुळे तो कायम इतरांपेक्षा वेगळा ठरला. (Indian) अनेक वर्षे एकाच ड्रेसिंग रूममध्ये राहिल्यामुळे प्रत्येक यशामागे त्याने किती परिश्रम घेतले, याची स्वतःला जाणीव असल्याचेही रोहितने नमूद केले. “तुझ्या उत्कृष्ट कारकिर्दीसाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा,” अशा शब्दांत त्याने रहाणेला शुभेच्छा दिल्या.
अजिंक्य रहाणेने भारतासाठी 85 कसोटी सामन्यांमध्ये 5,077 धावा करत 12 शतके आणि 26 अर्धशतके झळकावली. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 38.48 इतकी राहिली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 90 सामन्यांत 2,962 धावा करत 3 शतके आणि 24 अर्धशतके नोंदवली, तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 सामन्यांत 375 धावा आणि एक अर्धशतक त्याच्या नावावर आहे. फलंदाज म्हणूनच नव्हे, तर कर्णधार म्हणूनही (Indian) त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली. भारताचे नेतृत्व करताना त्याने 6 कसोटी सामन्यांपैकी 4 सामने जिंकले, तर 2 सामने अनिर्णित राखले. किमान पाच कसोटी सामने कर्णधार म्हणून खेळलेल्या भारतीय कर्णधारांमध्ये त्याचा विजयाचा टक्का सर्वोच्च राहिला.
2 मिनिटांत सोलून होईल लसूण, फक्त सोप्या ट्रिक्सचा करा अवलंब?
अनिल परब यांना मोठा दिलासा, मारहाण प्रकरणातून निर्दोष मुक्तता?