CJP रडारवर, फॉरेन फंडिंगविषयी सरकारचे मोठे पाऊल, मंत्र्यांनी थेट?

एक मोठी अपडेट समोर येत आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सीजेपीने जंतरमंतरवर सरकारविरोधात एल्गार पुकारला होता. या आंदोलनामुळे मोदी सरकारमधील शिक्षण मंत्र्यांची विकेट पडली होती. आता सरकारने सीजेपीविषयी एक मोठे पाऊल टाकले आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी मोठे संकेत दिले आहेत.

कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) 35 दिवस जंतर मंतरवर आंदोलन केले. नीट पेपरफुटी आणि तत्त्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीने एल्गार पुकारला होता. (Jantar Mantar) त्यांच्या दोन्ही मागण्या पूर्ण झाल्या. इतर काही मागण्यांविषयी सरकारने आश्वासन दिले आहे. आता सीजेपी सरकारच्या रडारवर आली आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी याविषयीचे मोठे संकेत दिले आहेत. यापूर्वी सुद्धा भाजप आणि एनडीएच्या गोटातून सीजेपीवर हल्ले सुरूच होते. आता सरकारने सीजेपीला परदेशातून निधी मिळत आहे की नाही याची चौकशी करण्याचे निश्चित केले आहे.

अभिजीत दिपके यांनी 16 मे 2026 रोजी सरन्यायधीशांच्या तरुणांविषयीच्या झुरळ टिप्पणीनंतर कॉक्रोच जनता पार्टी ही डिजिटल पार्टी सुरू केली. या पार्टीच्या सोशल मीडिया पेजवर फॉलोअर्सचा महापूर आला. अभिजीत दिपके कोण याची विचारपूस सुरू झाली. दिपके समोर आले. (Jantar Mantar) त्यानंतर त्यांनी आपच्या सोशल मीडियाची जबाबदारी सांभाळल्याचे समोर आले. दिपके बोस्टन विद्यापीठातून भारतात परतल्यावर त्यांनी आंदोलनासाठी रीतसर परवानगी मिळवली आणि नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन सुरू केले. त्यांच्या आंदोलनात पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी उडी घेतली. ते उपोषणाला बसले. या सर्व आंदोलनावर भाजपच्या गोटातून गंभीर आरोप करण्यात आले. तरीही तरुणाईने हे आंदोलन उचलून धरले.

हजारो तरुणांचे जत्थे दिल्लीतील जंतर मंतरकडे धावले. सीजेपी पक्षाला विदेशातून, परदेशातून निधी मिळत असल्याचा आरोप करण्यात आला. आता सीजेपीला फॉरेन फंडिंग करण्यात आली की नाही याची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. महाराष्ट्रात गृह विभागाने आणि केंद्रात ईडीकडून ही चौकशी सुरू असल्याची माहिती भोयर यांनी दिली आहे. सीजेपीसह इतर फॉरेन फंडिंग घेणाऱ्या संस्थांची चौकशी सुरू असल्याचे भोयर यांनी स्पष्ट केले.

या संस्था फॉरेन फंडिंगचा वापर सकारात्मक कामासाठी वापरत असतील तर हा निर्णय स्वागतार्ह आहे. पण देश, राज्य अथवा समाज अस्थिर करण्यासाठी हा पैसा वापरण्यात येत असेल, संस्था, संघटना जर त्यासाठी त्याचा वापर करत असतील. तर निश्चितपणे त्याची चौकशी करण्यात येईल, असे भोयर यांनी सांगितले. यामुळे सीजेपी ही आता केंद्रीय आणि राज्य तपास यंत्रणांच्या रडारवर आल्याचे मानले जात आहे. (Jantar Mantar) यापूर्वी अभिजीत दिपके यांनी फॉरेन फंडिंगच्या आरोपावर टीकाकारांना थेट उत्तर दिले होते. सरकारला जर संशय असेल तर त्यांनी चौकशी करावी असे दिपके म्हणाले होते. आता या चौकशीतून काय बाहेर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर विरोधकांनी हा सीजेपीला बदनाम करण्याचा आणि आंदोलकांना जेरीस आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा :

पोस्ट ऑफिसच्या RD योजनेत पैसे गुंतवल्यास होणार लाखोंचा नफा?

अजिंक्यच्या निवृत्तीनंतर रोहितची भावनिक पोस्ट?

आटपाडीत १३ लाखांचा गुटखा जप्त?