काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांनी अभिजीत दिपके यांच्या कुटुंबाची भेट घेतली होती, (meeting.) तर त्यानंतर बच्चू कडू यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेतली, या भेटीवरून आता एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर मोठं आंदोलन उभारलं होतं. तब्बल एक महिना हे आंदोलन सुरू होतं. आंदोलकांनी 20 जुलै रोजी संसद भवनावर मोर्चा देखील काढला, अखेर त्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजीत दिपके यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली होती. दरम्यान त्यानंतर जेव्हा अभिजीत दिपके हे त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा शिवसेनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या घरी जाऊन दिपके यांची भेट घेतली. मात्र या भेटीवरून आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगलेच नाराज झाले आहेत.
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, अभिजीत दिपके यांना भेटण्यासाठी परस्पर का गेलात? अशी विचारणा आता एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू आणि संजय शिरसाट यांच्याकडे केली आहे.(meeting.) महायुतीची भूमिका ठरली नसताना अभिजीत दिपके यांची भेट का घेतली असा सवाल करत एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांना झापल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीची भूमिका ठरलेली नसताना अशाप्रकारे न विचारता अभिजीत दिपके यांची भेट घ्यायला नको होती असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान बच्चू कडू आणि संजय शिरसाट यांच्या या भेटीवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. दरेकर यांच्या प्रतिक्रियेवरून या भेटीमुळे भाजपात देखील नाराज असल्याचं दिसून येत आहे. महायुतीमध्ये वितृष्ट निर्माण होईल असं वागू नका अशी प्रतिक्रिया या भेटीवर दरेकर यांनी दिली आहे, या भेटीमुळे आता महायुतीत वातावरण तापण्याची शक्यता आहे. (meeting.) याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडू आणि संजय शिरसाट यांची कानउघडणी करण्यात आली आहे.
हेही वाचा :
पोस्ट ऑफिसच्या RD योजनेत पैसे गुंतवल्यास होणार लाखोंचा नफा?