इराणला चारही बाजूंनी घेरण्याची तयारी ? अमेरिकेच्या नव्या डावाची चर्चा?

४७ वर्ष जागतिक आर्थिक निर्बंध लादले , राष्ट्राचा प्रमुखाची हत्त्या केली , तीन महिने युद्ध सुरु आहे तरीही इराण शरण येत नाही . यावर आता अमेरिका आणि इस्रायल आणखी एक प्लॅन आखत असल्याचे बोलले जात आहे . तो प्लॅन म्हणजे जमिनीवरील नाकेबंदी .

अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लावून आता ४७ वर्ष झाली आहेत . तसेच इराणच्या परदेशातील संपत्ती आणि पैसे देखील सीझ केले आहेत . तरी देखील इराण अजून अमेरिकेचा आणि इस्राइल चा मुकाबला करतोच आहे . इस्रायल ने सध्या तरी इराणवरील हल्ले थांबवले असले तरी अमेरिका ने हल्ले सुरु केले आहेत . याच बरोबर इराण देखील तेवढाच जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे . आखाती देशांनी सुद्धा आपल्या जागा अमेरिकन सैन्याला दिल्या आहेत . याच्या बदल्यात इराणने सौदी , जॉर्डन , कुवैत यांच्यावर देखील हल्ले केले आहेत . (assassination) याच युद्धात हुतींनी आणि इराक मधील इराण बंडखोर समर्थकांनी सुद्धा आपला मोर्चा आखाती देशांवर हल्ले करत वळवला आहे .

२९ जुलै २०२६ मध्ये नेतन्याहू आणि ट्रम्प यांची भेट झाली आहे . ते वाशिंग्टन मधील व्हाईट हाऊस इथे भेटले आहेत . अर्थात या भेटीला खूप सारे कंगोरे आहेत . अलीकडेच न्यू यॉर्कच्या महापौरांनी म्हणजेच भारतीय वंशाच्या जोहरान ममदानी यांनी नेतन्याहू न्यू यॉर्क मध्ये आल्यास आपण त्यांना अटक करू असे विधान केले होते . (assassination) त्यावर ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना आश्वस्त केले कि नेतन्याहू यांनी अमेरिकेत यावं , त्यांना अटक केले जाणार नाही . या भेटीत इस्रायल इराण युद्ध , गाझा युद्ध , आणि इस्राइल मधील निवडणुका हे विषय चर्चिले आहेत . असे मिळालेल्या माहिती वरून समजते .याशिवाय नेतन्याहू अमेरिकेचे दिवंगत रिपब्लिक पक्षाचे सीनेटर लिंडसे ग्रॅहम यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी गेले आहेत . लिंडसे ग्रॅहम हे कट्टर इस्रायल चे समर्थक होते . अशी ही माहिती मिळत आहे .

काही केल्या इराण शरण येत नाही , म्हणून आता इराणच्या बॉर्डर ज्या सात देशांशी जोडल्या आहेत . (assassination) त्यावर नाकेबंदी करून इराणला व्यापार करण्यास अडचणीत आणावे लागेल . अश्या चर्च्या ट्रम्प आणि नेतान्याहू भेटीमागे असल्याचेही बोलले जात आहे . जोपर्यंत इराण ची आर्थिक स्थिती पूर्णपणे मोडकळीस येत नाही तोपर्यंत इराण चर्चेसाठी तयार होणार नाही . तसेच जमिनीवरील नाकेबंदी केल्यास याचे परिणाम सरळ जनतेवर होतील . वस्तूंच्या प्रवासात अडचणी आल्या तर वस्तू महागात , आणि पूर्ण नाकेबंदी असल्यावर उपासमारीची ही वेळ येऊ शकते . असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे . असे घडल्यास इराणसाठी ही खूपच चिंतेची बाब आहे . सध्या इराण इराक, तुर्की, पाकिस्तान, अफगाणिस्तान, आर्मेनिया, अझरबैजान यांच्याशी आपली बॉर्डर शेअर करतो .

हेही वाचा :

पोस्ट ऑफिसच्या RD योजनेत पैसे गुंतवल्यास होणार लाखोंचा नफा?

अजिंक्यच्या निवृत्तीनंतर रोहितची भावनिक पोस्ट?

आटपाडीत १३ लाखांचा गुटखा जप्त?