सांगली जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने अत्यंत कठोर निर्णय दिला आहे. अवघ्या दीड वर्षांत खटल्याची सुनावणी पूर्ण करत आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, राज्यातील जलदगती न्यायालयाच्या महत्त्वाच्या निकालांपैकी हा एक मानला जात आहे.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी गावात घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. चार वर्षांच्या निष्पाप मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. (Sangli) पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपी पांडुरंग सोमना कळ्ळी (वय 46) याने मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत बांधून आपल्या घरातील लोखंडी पेटीत लपवून ठेवला होता. या प्रकरणात सांगली जिल्हा व सत्र न्यायालयातील बाल अत्याचार प्रतिबंधक विशेष न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.
पीडित मुलगी आपल्या आजीकडे राहत होती. तिची आई मुधोळ , कर्नाटक येथे माहेरी गेली होती, तर वडील बांधकामाच्या कामानिमित्त रत्नागिरी येथे होते. 2 फेब्रुवारी 2025 रोजी ती घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी शोध घेतल्यानंतरही ती सापडली नाही. (Sangli) त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि तपास सुरू करण्यात आला. मुलीच्या घराजवळ राहणारा आरोपी सुरुवातीला गावकऱ्यांसोबत शोधमोहीमेत सहभागी झाला होता. मात्र त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली. सुरुवातीला त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर मुलीचा मृतदेह त्याच्या घरातील लोखंडी पेटीतून जप्त करण्यात आला.
या घटनेनंतर संपूर्ण सांगली जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, (Sangli) यासाठी विविध सामाजिक संघटनांनी आंदोलने आणि मोर्चे काढले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करून अवघ्या 15 दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उल्लेख करत कठोर शिक्षेची मागणी केली. सर्व पुरावे आणि साक्षीदारांचा विचार करून न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. पुण्यातील नसरापूर येथील घटनेनंतर दीड वर्षांच्या आत जलदगती न्यायालयातून फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली ही राज्यातील दुसरी महत्त्वाची घटना ठरली आहे.
हेही वाचा :
पोस्ट ऑफिसच्या RD योजनेत पैसे गुंतवल्यास होणार लाखोंचा नफा?