गाढ झोपेत असताना डोंगर कोसळला 6 जणांचा दुर्दैवी अंत, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू?

मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम असतानाच घाटकोपर, अशोक नगर परिसरात पहाटेच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. गौसिया चाळीतील काही घरांवर डोंगराचा मोठा भाग अचानक कोसळला. या भूस्खलनात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती आहे. बचाव पथकांकडून घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.

घाटकोपर पूर्व आणि साकीनाका यांच्या दरम्यान असलेल्या अशोक नगरमधील गौसिया चाळ परिसरात पहाटे साधारण 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. परिसरातील नागरिक गाढ झोपेत असतानाच डोंगराचा मोठा भाग अचानक खाली सरकला आणि चाळीतील 2 ते 3 घरांवर थेट कोसळला. या घटनेमुळे काही घरे पूर्णपणे माती व दगडांच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली. प्राथमिक माहितीनुसार 3 ते 4 घरांना या भूस्खलनाचा मोठा फटका बसला आहे.

डोंगराचा भाग कोसळताच परिसरात मोठा आवाज झाला आणि नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. (mountain) अचानक आलेल्या या संकटामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत करण्यास सुरुवात केली. या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनीही या दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. दरम्यान, आणखी नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

भूस्खलनानंतर सुरुवातीला 5 ते 6 नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. मात्र, स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा आकडा 7 ते 8 पर्यंत असण्याची शक्यता आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांमध्ये यादव विकी, वाजिद अली आरिफ शेख , मन्नत , आबन शेख आणि सद्दाम शेख यांचा समावेश असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. (mountain) त्यांचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि घाटकोपर पोलीस यांची पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली. ढिगारा हटवून त्याखाली अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मुंबईत सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि परिसरातील मोठ्या प्रमाणावरील चिखल यामुळे बचावकार्य करताना अडचणी येत आहेत. ढिगारा हटवण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री घटनास्थळी आणण्यात आली आहे. प्रशासनाकडून अडकलेल्या नागरिकांना शक्य तितक्या लवकर बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. (mountain) तसेच, परिसरातील इतर धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनाही प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा :

पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा बदल? सर्वसामान्याचं टेन्शन वाढलं?

ट्रम्प टॅरिफमुळे महाराष्ट्र राज्यासमोर नवे आव्हान?

मिरज पंचायत समितीत अधिकाऱ्यांना कोंडले?