पुढील दोन वर्षांत १० हजार ऑटोलूम इचलकरंजीत येत आहेत. यातील एका ऑटोलूमची किमत ४० लाखांपर्यंत आहे. (Ichalkaranji) यासाठी लागणारे कामगार महिलांना प्रशिक्षण देऊन तयार करीत आहोत.

कामगारांना राहण्यासाठी घरकुल योजना राबवित आहोत. (Ichalkaranji) त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. यापूर्वी यंत्रमाग उद्योगासाठी २३ कलमी योजना आणली होती. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, प्रसंग पडला तर पुन्हा एकदा वस्त्रोद्योगासाठी अशाप्रकारची योजना आणली जाईल, त्यासाठी मला दिल्लीला पाठवा, असे आवाहन माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी केले.
इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनच्या ७८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यानिमित्ताने पुन्हा खासदारकीसाठी इच्छुक असल्याच्या भावना श्री. आवाडे यांनी व्यक्त केल्या. त्यानंतर उपस्थित यंत्रमागधारकांनी हात उंचावत त्यांना प्रतिसाद दिला. मी थांबत नाही. इचलकरंजी एक्स्पोर्ट सिटी करणार आहे. माझ्यावर कोणी कितीही टीका करू देत, पण पाच वर्षे थांबा, देशातील लोक वस्त्रोद्योग बघण्यासाठी इचलकरंजीला येतील, असे जोरदार प्रत्युत्तरही आवाडे यांनी विरोधकांना दिले.
ते म्हणाले, ‘वस्त्रोद्योगात मंदी वगैर काही नाही. प्रोसेस बंदमुळे त्रास होत आहे. त्यातून ते मार्ग काढीत आहेत, पण तुम्ही हवालदिल होऊ नका, तर कापड निर्मिती करताना व्हरायटी काढण्यावर भर द्या. आज चांगल्या कापडाला मागणी आहे. अनेकांचे पुढील पाच-सहा महिन्यांचे बुकिंग आहे. काहीजणांकडे वर्षभराची ऑर्डर आहे. (Ichalkaranji) त्यामुळे या उद्योगातील नवी पिढी जोरात आहे. आता रडत बसायचे नाही. आता ब्रँडिंगमध्ये उतरण्याची तयारी ठेवा. आपले भांडवल आपल्याकडे ठेवा.’
हेही वाचा :
केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची थलपती विजय यांनी घेतली भेट, केल्या या दोन मोठ्या मागण्या?
शिंदेंच्या या खासदाराला 100 टक्के मंत्रिपद मोंदीच्या मंत्रिमंडळात थेट विधानाने चर्चेला उधाण?
शरद पवारांबरोबरच्या बैठकीत काय घडलं पार्थ पवार काय म्हणाले अखेर बातमी आली समोर?