महाराष्ट्रातल्या भाजपच्या मंत्र्यांचे अभिजीत दीपके यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. काँग्रेस नेत्यांच्या आश्रमशाळांना भेट द्या, असं आव्हान मंत्री उइके यांनी दिलं.

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी आदिवासी स्कूल चलो अभियान सुरू केलं आहे. या मोहिमेच्या माध्यमातून दीपके आदिवासी आश्रमशाळांची पाहणी करत आहेत. या पाहणीदरम्यान सत्ताधाऱ्यांकडून पुरवण्यात येणाऱ्या सुविधांची पोलखोल करत आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून अभिजीत दिपके हे सातत्याने सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहे. दीपके हे महाराष्ट्रातील विविध आदिवासी भागात जाऊन पाहणी करत असल्याचे दिसत आहेत. परंतु अभिजीत दीपके हे काँग्रेस नेत्यांच्या आश्रमशाळांना भेट देत नसल्याचा आरोप आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केला. (Abhijit Deepke) त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्याही आश्रमशाळांना भेट देण्याचे आव्हान मंत्री उइके यांनी केलं.
काँक्रोच जनता पार्टीचे दिपके हे काल नंदूरबारच्या दौऱ्यावर होते. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची चाचणी केली. अक्कलकुवा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दीपके यांनी पाहणी केली. त्यांनी केंद्रात डॉक्टर आणि कर्मचारी गैरहजर असल्याचा दावा केला. सरकारकडे पैशांची कमतरता नाही, बजेट आहे. मात्र उपलब्ध निधीचा योग्य वापर केला जात नसल्याचा आरोप दीपकेंनी केला आहे. ५० खोके एकदम ओके, पण हेल्थकेअर कधी ओके? आदिवासी शाळा कधी ओके? आमदार ओके झाले, खासदारही ओके झाले, मग ही मुलं कधी ओके होणार? असा दिपके यांनी सरकारला सवाल केला. दिपकेंच्या दौऱ्यामुळे सरकारच्या आदिवासी विकास विभागाची एकच धावपळ उडत असल्याचे सांगण्यात येत आहे. (Abhijit Deepke) त्यानंतर आता दिपकेंच्या दौऱ्यावरच आता मंत्री उइके यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
सत्ताधाऱ्यांवरील आरोपानंतर मंत्री अशोक उइके यांनी दिपकेंना आदिवासी स्कूल चलो अभियानावरून आव्हान दिलं आहे. (Abhijit Deepke) बहुतांश आदिवासी आश्रमशाळा या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या आहेत. दिपकेंनी काँग्रेस नेत्यांच्या आश्रमशाळांना भेट द्यावी. नाहीतर दीपके राजकारण करत असल्याचे सिद्ध होईल. येत्या 3 महिन्यात आश्रमशाळांचे ऑडिट करणार आहे. सोयीसुविधा न देणाऱ्या आश्रमशाळांवर कारवाई करणार असल्याचेही मंत्र्यांनी स्पष्ट केले. मंत्री अशोक उइके यांनी अभिजीत दिपके यांना खुलं आव्हान दिलं आहे. उईके यांच्या चॅलेंजनंतर दिपके आव्हान स्वीकारणार का, हे आता पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.
हेही वाचा :
गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय?