सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या संभाव्य बँक संपाचा परिणाम केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या नियमित देयकांवर होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने वेतन आणि निवृत्तीवेतनाची रक्कम मुदतीपूर्वी देण्याचा निर्णय घेतला आहे. (salaries and pensions) त्यानुसार सप्टेंबर महिन्याचे वेतन आणि निवृत्तीवेतन २५ सप्टेंबर २०२६ रोजी खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

अर्थ मंत्रालयाने यासंदर्भात २५ सप्टेंबर रोजी वेतन आणि निवृत्तीवेतन देण्यास मंजुरी दिली आहे. महालेखा नियंत्रक कार्यालयाने २३ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या कार्यालयीन ज्ञापनानुसार, संरक्षण, टपाल आणि दूरसंचार विभागांसह सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सप्टेंबरचे वेतन २५ सप्टेंबरला देण्यात येणार आहे. (salaries and pensions) औद्योगिक कर्मचाऱ्यांचे वेतनही याच दिवशी देण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारी निवृत्तीवेतनधारकांचे सप्टेंबर महिन्याचे निवृत्तीवेतनही २५ सप्टेंबरला बँका आणि वेतन व लेखा कार्यालयांमार्फत देण्यात येणार आहे.दरम्यान, २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांचा देशव्यापी बँक संप प्रस्तावित आहे. (salaries and pensions) त्यामुळे बँकिंग व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस तसेच तिमाहीअखेरच्या काळात हा संप असल्याने वेतन आणि निवृत्तीवेतनाच्या व्यवहारांमध्ये अडथळा येऊ नये, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. २५ सप्टेंबरला मिळणारे वेतन आणि निवृत्तीवेतन आगाऊ देयक म्हणून गणले जाणार आहे. तसेच, सप्टेंबरअखेरची शक्य तितकी इतर देयके आणि बँकिंग व्यवहारही आगाऊ करण्याच्या सूचना मंत्रालये व विभागांना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा :
गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय?