बेशुद्ध महिला, रडणारी मुले अन् जवानाची तत्परता महाद्वार रोडवरील मिरवणुकीतून खांद्यावरून पोहोचविले रुग्णालयात?

कोल्हापूर महाद्वार रोडवर मिरवणुकीचा जल्लोष रात्री नऊच्या सुमारास मंडळांची पुढे जाण्याची घाई साउंड सिस्टीमच्या आवाजासह गोंगाटात (processions) अचानक महिला बेशुद्ध पडली सोबत आलेल्या मुलांनी रडतच मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. बंदोबस्तासाठी तैनात कामण्णा शंकर कांबळे यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी महिलेला उचलून खांद्यावर घेतले.

सहकाऱ्यांच्या मदतीने जवळपास आठशे मीटर धावत जाऊन रंकाळा स्टॅन्ड परिसरातील रुग्णालय गाठले. वेळीच उपचार झाल्याने महिलेचे प्राण वाचले. भारत राखीव बटालियनमध्ये जवान असलेले कामण्णा कांबळे (रा. जत. जि. सांगली) महाद्वार चौकात कर्तव्यावर होते. महाद्वार रोडवर जाण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांची गर्दी जमल्याने चेंगराचेंगरीचा प्रकार घडला.

पोलिसांनी अनेकांना लाठीचा प्रसाद देत ताराबाई रोडवरून बाहेर काढले. पण, (processions) याच घाईगडबडीत एक महिला अचानक बेशुद्ध झाली. दोन लहान मुलांना घेऊन त्या मिरवणूक पाहण्यास आल्या होत्या. या दोन्ही मुलांसमोरच आई बेशुद्ध झाल्याने त्यांनी आरडाओरड सुरू केली. भेदरलेली मुले रडण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हती. रडणारी ही दोन मुले कामण्णा कांबळेंच्या नजरेस पडली.

गर्दीतून ते पुढे सरसावले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी महिलेला खांद्यावर घेतले. सहकारीही त्यांच्यासोबत गर्दीतून वाट काढत मदतीला धावले. जमाव पांगवत कांबळे यांनी जवळपास आठशे ते हजार मीटर धावत जाऊन या महिलेला उपचारास दाखल केले. रक्तदाब कमी झाल्याने ही महिला बेशुद्ध झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. (processions) अवघ्या काही वेळेतच उपचार मिळाल्याने तिचे प्राण बचावले. महिलेसह कुटुंबीयांनी जवान कामण्णा यांचे आभार मानले. कामण्णा हे बारा वर्षांपासून राखीव पोलिस दलात कार्यरत आहेत. त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

हेही वाचा : 

बँका रविवारी सुरू, सोमवारी बंद कारण काय? पुढच्या आठवड्यात कोणत्या दिवशी व्यवहार करता येणार?

MPSC पेपरफुटी प्रकरणात रोहित पवारांचा खळबळजनक दावा, थेट स्क्रीनशॉट शेअर करून नवा आरोप काय?

 केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर ऑक्टोबरमध्ये मिळणार मोठी पगारवाढ?