वडगाव-हातकणंगले मार्गावर भीषण अपघात दुचाकीवरील बँक व्यवस्थापकाचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी?

वडगाव-हातकणंगले रस्त्यावर मिणचेजवळ भरधाव मोटारीने समोरून येणाऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जागीच ठार झाले. दीपक रावसाहेब शिंदे (वय ४२, रा. दत्त मंदिराजवळ, भरतनगर, मिरज) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. (accident) त्यांची पत्नी आशादेवी शिंदे (३७) या अपघातात गंभीर जखमी झाल्या. हा अपघात सोमवारी (ता. २८) सकाळी आठच्या सुमारास घडला. शिंदे हे सांगली येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेत व्यवस्थापक होते.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : दीपक शिंदे यांचे पेठवडगाव येथील हनुमान रोड परिसरात नातेवाईक आहेत. नातेवाइकांपैकी एकजण आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी शिंदे दांपत्य रविवारी वडगाव येथे आले होते. सोमवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास दोघेही दुचाकीवरून (एमएच १० बीएल १६६१) मिरज येथे परत जाण्यासाठी निघाले होते. मिणचेकडून समोरून येणाऱ्या भरधाव मोटारीचे नियंत्रण सुटल्याने त्यांनी थेट शिंदे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की पती-पत्नी हवेत उडाले अन्‌ रस्त्यापासून लांब शेतात फेकले गेले. (accident) यामध्ये दीपक शिंदे जागीच ठार झाले, तर आशादेवी यांच्या पायाला, खुब्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन (accident) जखमी महिलेला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. दीपक शिंदे यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. मोटार चालक राजू फाजल (वय २४, रा. यड्राव, शिरोळ) याच्यावर गुन्हा दाखल झाला. या अपघाताची नोंद वडगाव पोलिस ठाण्यात झाली. पोलिस निरीक्षक गोरख चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कराड तपास करत आहेत.

हेही वाचा : 

२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का प्रमुख नेत्याला डेंग्यू?

UPI व्यवहारांवर चार्जेस सर्वोच्च न्यायालयात आज काय घडलं दिलासा की?

दुष्काळाच्या यादीत सांगली जिल्ह्यातील चारच तालुके?