लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम?

सप्टेंबर महिना संपत आला तरी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता खात्यात जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. ऑगस्ट महिन्याचा हप्ता प्रलंबित असल्याने (amount) यावेळी महिलांच्या खात्यात १,५०० रुपये जमा होणार की ऑगस्ट आणि सप्टेंबरचे मिळून ३,००० रुपये मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

राज्य सरकारने २४ सप्टेंबर रोजी ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वर्ग केला. त्यानंतर पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, यावेळी महिलांना ३,००० रुपयांचा एकत्रित हप्ता मिळणार नसून सध्या केवळ ऑगस्ट महिन्याचे १,५०० रुपये जमा केले जात आहेत. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योजनेतील अनेक अपात्र लाभार्थी वगळण्यात आले आहेत. त्यामुळे लाभार्थी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. सध्या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता टप्प्याटप्प्याने DBTच्या माध्यमातून जमा केला जात आहे. पात्र महिलांच्या खात्यात पुढील काही दिवसांत १,५०० रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी राज्य सरकारने २४ सप्टेंबर रोजी शासन निर्णय जारी केला असून, पात्र लाभार्थी महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा ३३९ कोटी १४ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. या निधीतून पात्र महिलांच्या बँक खात्यात १,५०० रुपयांचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ DBTच्या माध्यमातून आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यात थेट जमा केला जातो. पैसे जमा झाल्यानंतर बँकेकडून नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठवला जातो. (amount) त्यामुळे लाभार्थींनी आपल्या मोबाईलमधील Messages किंवा Inbox तपासणे महत्त्वाचे आहे.

याशिवाय ‘नारी शक्ती दूत’ ॲपच्या माध्यमातूनही हप्त्याचे स्टेटस तपासता येते. त्यासाठी ॲप उघडून आपल्या खात्याने लॉगिन करावे आणि ‘माझे अर्ज’ या पर्यायावर क्लिक करावे. अर्ज Approved असल्यास हप्ता आणि (amount) त्याच्या स्टेटसची माहिती पाहता येईल. तसेच GPay, PhonePe, Paytm किंवा BHIM UPIच्या माध्यमातून बँक बॅलन्स आणि Transaction History तपासून पैसे जमा झाले आहेत का, हे पाहता येते. बँकेच्या Missed Call Banking सुविधेचा वापर करून किंवा जवळच्या ATMमधून Mini Statement काढूनही खात्यातील व्यवहार तपासता येतील. सध्या उपलब्ध माहितीनुसार पात्र महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता जमा केला जात आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरचे मिळून ३,००० रुपये एकत्रितपणे जमा केले जात नसून, सध्या केवळ ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्यात येत आहे.

हेही वाचा : 

२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का प्रमुख नेत्याला डेंग्यू?

UPI व्यवहारांवर चार्जेस सर्वोच्च न्यायालयात आज काय घडलं दिलासा की?

दुष्काळाच्या यादीत सांगली जिल्ह्यातील चारच तालुके?