बीसीसीआयचा अजब फर्मान कॅप्टन गिलसह दोन खेळाडूंसाठी सक्त नियम, करो किंवा मरो परिस्थिती

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दौरा होणार असून या दौऱ्यापूर्वी भारतीय संघासाठी बीसीसीआयने एक फर्मान काढला आहे. बीसीसीआयने आता मोजक्या खेळाडूंसाठी काही कठोर निर्बध लादले आहेत.

शुभमन गिल आणि केएल राहुल सध्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळण्यात व्यस्त आहेत. जसप्रीत बुमराह आशियाई खेळांसाठी जपानला गेला आहे. (Indian team) त्यानंतर ते रणजी ट्रॉफीमध्ये आपापल्या संघांकडून खेळताना दिसू शकतात. गिल, राहुल आणि बुमराह यांच्या रणजी ट्रॉफीमधील सहभागामागे न्यूझीलंड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जारी केलेला बीसीसीआयचा आदेश असू शकतो.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी प्रत्येक वरिष्ठ खेळाडूला किमान एक रेड-बॉल सामना खेळणे अनिवार्य असेल. बीसीसीआयच्या या आदेशानुसार, शुभमन गिल आणि केएल राहुल आपापल्या राज्य संघांकडून रणजी सामने खेळताना दिसू शकतात. रणजी ट्रॉफी ११ ऑक्टोबरला सुरू होत आहे, ज्यात शुभमन गिल पंजाबकडून खेळू शकतो. केएल राहुल कर्नाटक संघाकडून खेळताना दिसू शकतो. जसप्रीत बुमराह देखील न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी इंडिया ‘अ’ संघाकडून एकतर रणजी ट्रॉफी सामना किंवा रेड-बॉल सामना खेळेल.

टाइम्स ऑफ इंडियाने लिहिले आहे की, एक वरिष्ठ खेळाडू किती लाल चेंडूचे सामने खेळेल हे वैद्यकीय पथकाची परवानगी आणि खेळाडूच्या कामाच्या भारावर अवलंबून असेल. काही खेळाडू दोन्ही फॉरमॅटमध्ये खेळतात. (Indian team) त्यामुळे, कोणतीही तडजोड न करता त्यांना लाल चेंडूचे सामने खेळण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय किंवा कामाच्या भाराशी संबंधित कोणतीही अडचण नसल्यास, कर्णधार गिलसह प्रत्येक वरिष्ठ खेळाडूला किमान एक लाल चेंडूचा सामना खेळणे बंधनकारक असेल.

बीसीसीआयचा हा निर्णय न्यूझीलंड दौऱ्याच्या तयारीसाठी आहे. भारताचा न्यूझीलंड दौरा २२ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. भारतीय संघ १९ नोव्हेंबरपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. लाल चेंडूच्या सरावाशिवाय मालिकेत उतरण्याचे परिणाम भोगावे लागू नयेत, अशी बीसीसीआयची इच्छा आहे, म्हणूनच सर्व वरिष्ठ खेळाडूंना किमान एक सामना खेळणे अनिवार्य केले आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटची कसोटी मालिका २०२४ मध्ये खेळली गेली, जी तीन सामन्यांची मालिका होती. ही मालिका भारतात खेळली गेली, जिथे न्यूझीलंडने भारताला व्हाईटवॉश दिला. मायदेशात न्यूझीलंडकडून भारताचा हा पहिला कसोटी मालिका पराभव होता. (Indian team)आता हेच चित्र पुन्हा दिसू नये म्हणू बीसीसीआयने थेट हा फर्मान काढला असावा असे म्हटले जात आहे.

हेही वाचा : 

२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का प्रमुख नेत्याला डेंग्यू?

UPI व्यवहारांवर चार्जेस सर्वोच्च न्यायालयात आज काय घडलं दिलासा की?

दुष्काळाच्या यादीत सांगली जिल्ह्यातील चारच तालुके?