ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. (businesses) यामुळे हॉटेल, खाणावळ आणि व्यवसायांवर खर्चाचा बोझा वाढणार असून, सामान्य नागरिकांनाही महागाईचा फटका बसेल. राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी या दरवाढीवर सरकारला खोचक टोला लगावला आहे.

ऑक्टोबर महिना सुरू झाला असून पहिल्याच दिवशी सिलेंडरचे भाव वाढले आहेत. व्यावसायिक सिलेंडरचे दर 70 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांचं कंबरडं मोडलं आहे. या दरवाढीवर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी खोचक ट्विट केलं आहे. हल्ली 1 तारीख आली की मनात धडकीच भरते. कुठल्या बाजूने सामान्य जनतेवर सर्जिकल स्ट्राईक होईल हे सांगता येत नाही, असं ट्विट रोहिणी खडसे यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून ट्विटची जोरदार चर्चा होत आहे.
हल्ली 1 तारीख आली की मनात धडकी भरते. सरकार कुठल्या बाजूने आम्हा सामान्य जनतेवर सर्जिकल स्ट्राईक करेल सांगता येत नाही. आज 1 ऑक्टोबरपासून जनतेच्या आर्थिक गोष्टींवर विविध नियम लावून सामान्य जनतेला झटका दिलाच होता, पण व्यवसायिक सिलेंडरचे दर 70 रुपयांनी वाढवून ‘बोनस’ झटका दिला आहे. वर्षाच्या सुरुवातीला जे व्यवसायिक सिलेंडर 1684 रुपयांना मिळायचे ते आता 2954 रुपयांना मिळत आहेत. 9 महिन्यात जवळपास 1500 रुपयांची वाढ झाली आहे, असं ट्विट रोहिणी खडसे यांनी केलं आहे.
व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले म्हणजे हॉटेल, खानावळ, कँटीनचे जेवण महागले. याचा थेट फटका सामान्य माणसाच्या खिशाला बसेल पण सामान्य माणसाने नाराज व्हायचे नाही. आपला जीडीपी 7.8 टक्क्यांनी वाढला यातच आनंद व्यक्त करायचा, असा खोचक टोलाही रोहिणी खडसे यांनी लगावला आहे. (businesses) दरम्यान, जिओपॉलिटिक्स तणाव आणि पुरवठ्याची कमतरता यामुळे आणखी एका महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत. आज 1 ऑक्टोबरपासून व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. वेगवेगळ्या शहरात 19 किलोग्रॅमच्या सिलेंडरच्या किमतीत 71.50 रुपयांनी वाढ झाली आहे. सणासुदीच्या आधीच व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने रेस्टॉरंट, हॉटेल, कॅटर्स आणि व्यावसायिक एलपीजीचा वापर करणाऱ्या इतर व्यवसायांवर खर्चाचा बोझा वाढणार आहे. परिणामी महागाई वाढणार आहे.
दिल्लीत 19 किलोच्या कमर्शिअल एलपीजी सिलेंडरची किंमत सप्टेंबरमध्ये 2,747.50 रुपये होती. आता त्यात 62.50 रुपये वाढल्याने या सिलेंडरची किमत आजपासून 2,810 रुपये झाली आहे. सप्टेंबरमध्येही दिल्लीत गॅस सिलेंडरची 9.50 रुपयाने वाढली होती. मुंबईत व्यावासयिक गॅस सिलेंडरची किंमत 2,764 रुपये आहे. तर चेन्नईत 2,983 रुपये आहे. पटनामध्ये 71.50 रुपयाने वाढून 3,100.50 रुपये झाली आहे.घरगुती गॅस सिलेंडरच्या ग्राहकांना मात्र दिलासा मिळालेला आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर जैसे थे आहेत. (businesses) त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत 942 रुपये, मुंबईत 941.50 रुपये आणि चेन्नईत 957.50 रुपये आहे.
हेही वाचा :
बापरे सोन्याच्या भावात उसळी, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती