१३ वर्षांच्या मुलीचा पाठलाग, पडकी इमारत अन् धमक्या ६ जणांच्या कृत्याने खळबळ

हरियाणातील ग्रेटर फरीदाबादमधील एका पडक्या इमारतीत १३ वर्षीय चिमुरडीवर सामूहिक अत्याचार, तर तिच्या १६ वर्षीय मैत्रिणीचा विनयभंग केल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत गुरुवारी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्यात एकूण सहा जणांचा सहभाग असून फरार असलेल्या उर्वरित तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सुमारे महिन्याभरापूर्वी म्हणजेच २४ ऑगस्ट रोजी घडली. आठवीत शिकणारी पीडित मुलगी क्लासमधून घरी परतत असताना तिच्या १६ वर्षीय मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली होती. (shocking) त्या दोघी एकत्र असताना सहा नराधमांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना एका पडीक इमारतीत नेले. तिथे जिवे मारण्याची धमकी देत आरोपींनी चिमुरडीवर अत्याचार केला.

घाबरलेल्या दोन्ही मुलींनी सुरुवातीला ही घटना कुटुंबीयांपासून लपवून ठेवली. मात्र, पीडित मुलीच्या वर्तनात बदल दिसू लागल्याने तिच्या आईने प्रेमाने विचारपूस केली. (shocking) त्यावेळी मुलीने आपबिती सांगितली. यानंतर कुटुंबीयांनी तातडीने २९ सप्टेंबर रोजी बीपीटीपी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रार आणि वैद्यकीय तपासणीच्या अहवालानंतर पोलिसांनी सामूहिक बलात्कार आणि लैंगिक छळाच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कुणाल, दीपक आणि यश या तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, गुरुवारी रात्री त्यांना स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने (shocking) त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

हेही वाचा : 

बापरे सोन्याच्या भावात उसळी, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती

शहर आणि परिसरात पावसाची जोरदार हजेरी

धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार