केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम २,००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मात्र, ही योजना केवळ पुरुष शेतकऱ्यांसाठीच आहे का, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो.

सरकारी नियमानुसार, महिला शेतकरीदेखील पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र, (farmer) त्यासाठी संबंधित महिलेने योजनेच्या पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. महिला शेतकऱ्यांसाठी लागू असलेल्या महत्त्वाच्या नियमांची माहिती जाणून घेऊया…
महिलेच्या नावावर शेतीची जमीन असणे आवश्यक पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्याच्या नावावर शेतीयोग्य जमीन नोंदणीकृत असणे महत्त्वाचे आहे. (farmer) त्यामुळे महिला शेतकऱ्याच्या नावावर जमीन असल्यास ती या योजनेसाठी पात्र ठरू शकते. मात्र, जमीन केवळ पती किंवा कुटुंबातील अन्य पुरुष सदस्याच्या नावावर असल्यास, केवळ महिला असल्याच्या आधारावर संबंधित महिलेला स्वतंत्रपणे पीएम किसानचा लाभ मिळत नाही.
कुटुंबातील एकाच सदस्याला लाभ पीएम किसान योजनेत एका शेतकरी कुटुंबातील केवळ एका सदस्याला लाभ दिला जातो. शेतकरी कुटुंबामध्ये पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, एखाद्या कुटुंबातील पतीला पीएम किसानचा लाभ मिळत असेल, तर त्याच कुटुंबातील पत्नीने स्वतंत्र अर्ज केल्यास तिला पुन्हा या योजनेचा लाभ मिळणार नाही.
आयकर भरणारे आणि काही सरकारी कर्मचारी अपात्र महिला शेतकरी किंवा त्यांच्या पतीने आयकर भरत असल्यास संबंधित शेतकरी कुटुंब पीएम किसान योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणार नाही. याशिवाय, घटनात्मक पदांवर कार्यरत व्यक्ती, काही श्रेणीतील सरकारी कर्मचारी तसेच १० हजार रुपयांपेक्षा अधिक मासिक पेन्शन घेणारे माजी कर्मचारी यांनाही योजनेच्या लाभातून वगळण्यात आले आहे.
e-KYC आणि आधार लिंक बँक खाते आवश्यक पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र महिला शेतकऱ्यांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच बँक खाते आधारशी जोडलेले आणि DBT साठी सक्षम असणे गरजेचे आहे. याशिवाय, संबंधित शेतजमिनीची माहिती योजनेच्या नोंदीशी जोडलेली म्हणजेच land seeding पूर्ण असणे आवश्यक आहे. या प्रक्रिया अपूर्ण राहिल्यास पात्र असूनही २,००० रुपयांचा हप्ता खात्यात जमा होण्यास अडचण येऊ शकते.
महिला शेतकऱ्यांनी काय तपासावे महिला शेतकऱ्यांनी पीएम किसानचा लाभ घेताना आपल्या नावावर शेतीची नोंद आहे का, e-KYC पूर्ण आहे का, आधार-बँक खाते लिंक आहे का आणि जमिनीची माहिती योजनेच्या नोंदीत अपडेट आहे का, हे तपासणे महत्त्वाचे आहे. (farmer) थोडक्यात, पीएम किसान योजना महिला शेतकऱ्यांसाठीही खुली आहे. मात्र, जमीन मालकीसह योजनेच्या सर्व पात्रता अटी पूर्ण केल्यानंतरच संबंधित महिलेला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
हेही वाचा :
नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना दिलासा ऑगस्टचा 1500 रुपयांचा हप्ता खात्यात जमा
ऑक्टोबरचा उन्हाळा त्रासदायक ठरतोय उष्णतेपासून बचावासाठी करा सोपे उपाय