बावनकुळे, पटोले, वडेट्टीवारांसह १४ बड्या आमदारांना मतदानाला बंदी

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच एक रंजक माहिती समोर आली आहे. या निवडणुकीत विभागातील तब्बल १४ आमदार आणि २ खासदारांना मतदान करता येणार नाही. विशेष म्हणजे आपल्या-आपल्या मतदारसंघातील राजकारणावर प्रभाव असलेले हे लोकप्रतिनिधीच पदवीधर मतदारसंघाचे मतदार नसल्याचे समोर आले आहे.

पदवीधर मतदारसंघासाठी मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी संबंधित व्यक्तीने पदवी शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक असते. (election) त्यामुळे केवळ आमदार किंवा खासदार असणे पुरेसे नसते. नागपूर विभागातील ३२ आमदारांपैकी १४ आमदारांची शैक्षणिक पात्रता पदवीपर्यंत पोहोचलेली नसल्याने त्यांना या निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळालेला नाही. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावरही २०२६ मधील पदवीधर मतदारसंघासाठी स्वतंत्र मतदार नोंदणी प्रक्रिया असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या यादीत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील कृष्णा खोपडे यांचे शिक्षण सातवीपर्यंत, चरणसिंह ठाकूर यांचे बारावीपर्यंत, मोहन मते यांचे ITI, प्रवीण दटके यांचे डिप्लोमा प्रथम वर्षापर्यंत, तर चंद्रशेखर बावनकुळे यांचे B.Sc. प्रथम वर्षापर्यंत शिक्षण झाल्याचे वृत्तांत नमूद करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात विजय वडेट्टीवार आणि किशोर जोरगेवार यांचे शिक्षण दहावीपर्यंत असल्याचे नमूद आहे. भंडारा जिल्ह्यात राजू कारेमोरे बारावीपर्यंत, तर नाना पटोले B.A. द्वितीय वर्षापर्यंत शिकले आहेत. गोंदिया जिल्ह्यात विनोद अग्रवाल आणि संजय पुराम यांचे शिक्षण बारावीपर्यंत असल्याचे सांगण्यात आले आहे. गडचिरोलीतील धर्मरावबाबा आत्राम यांचे शिक्षण दहावीपर्यंत, तर वर्ध्यातील समीर कुणावार बारावी आणि राजेश बकाने B.A. प्रथम वर्षापर्यंत शिकले आहेत.

केवळ आमदारच नाही, तर दोन खासदारही या मतदारसंघात मतदान करू शकणार नाहीत. रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांचे शिक्षण B.A. द्वितीय वर्षापर्यंत, तर राज्यसभा खासदार माया इवनाते यांचे शिक्षण पाचवीपर्यंत असल्याचे वृत्तांत नमूद करण्यात आले आहे. (election) त्यामुळे त्यांचाही पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत समावेश झालेला नाही.

एकूणच, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही सर्वसाधारण विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीपेक्षा वेगळ्या मतदार पात्रतेवर आधारित असल्याने लोकप्रतिनिधी असतानाही पदवीची अट पूर्ण न करणाऱ्या आमदार आणि खासदारांना येथे मतदान करता येत नाही.(election) त्यामुळे नागपूर विभागातील सध्याच्या निवडणुकीत या १४ आमदार आणि २ खासदारांचा मतदानाचा अधिकार नसणे हा चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा : 

राज्यातील साखर कामगार २२ ऑक्टोबर पासून बेमुदत संपावर कोल्हापुरात इशारा मोर्चावेळी घोषणा

MPSC च्या अध्यक्षांचा राजीनामा घेणार का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले

सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना आई-बाळाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू