‘गैरसमज करून घेऊ नका हसन माझा मित्र’ नाना पाटेकरांनी घातली होती कोल्हापुरातील मंत्र्यास एकेरी मैत्रीपूर्ण साद

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि कोल्हापुरातील जेष्ठ मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील मैत्रीपूर्ण नाते चार वर्षांपूर्वी कोल्हापुरात पाहायला मिळाले होते. या भेटी वेळी नाना पाटेकर यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना एकेरी साद घातली होती. मुश्रीफ यांना बोलवण्याच्या नादात आपल्या गाडीची धडक कशी बसली होती याचा किस्साही त्यांनी ऐकावला होता.

खरे तर एक नेता. दुसरा अभिनेता. अभिनेत्याने मंत्री असलेल्या नेत्याला एकेरी उल्लेख करत दिलखुलास संवाद रंगवला. हे पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या गेल्या. दोघांमधील मैत्रीपूर्ण प्रसंग कोल्हापुरात एप्रिल २०२२ मध्ये घडला होता. त्याचे असे झाले होते. कागल येथे चार महापुरूषांच्या पुतळ्याचे अनावरण अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते आयोजित केले आहे. (Kolhapur) याचे संयोजक ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आहेत. कार्यक्रमासाठी आलेल्या पाटेकर यांचा मुक्काम येथील एका हॉटेलवर होता. मुश्रीफ तेथे नानांचे स्वागत करण्यासाठी गेले. मुश्रीफ भेटण्यासाठी येत असल्याचे समजताच नाना खोलीच्या बाहेर येऊन उभे राहिले. मुश्रीफ समोर येताच नानांनी त्यांना अलिंगन दिले. इतकेच नाही तर मैत्रीच्या पातळीवर संवाद रंगवला.

नाना पाटेकर म्हणाले, अरे तु इकडे कशाला आलास? मीच तुला भेटण्यासाठी तुझ्याकडे येणार होतो. उत्तरादाखल मुश्रीफ म्हणाले, असे कसे?… पाहूण्यांचे स्वागत,आदरातिथ्य करणं हे आम्हां कोल्हापूकरांचे संस्कार आहेत. पुढे दोघांत दिलखुलास गप्पा रंगल्या. मैत्रीसाठी नानांचा दे धक्का यावेळी मंत्री मुश्रीफ यांचा नानांनी केलेला एकेरी उल्लेख ऐकून सोबत असलेले व्ही. बी. पाटील, राजेश लाटकर आदी उपस्थित अवाक झाले. तत्परतेने नाना म्हणाले, हसन माझा जवळचा दोस्त आहे रे. उगाच गैरसमज करून घेऊ नका.(Kolhapur) त्यावर नानांनी एक मासलेवाईक किस्सा ऐकवला. काही दिवसांपुर्वी मुंबईत रस्त्याने जात असलेला हसन मला दिसला. मी ‘हसन…हसन असे म्हणत निघालो. या घाईत गाडी दुसऱ्याला धडकली.’ त्यावर उपस्थितात हास्य पसरले.

मी जिंकावं यासाठी अशोक सराफ पत्त्यांचा डाव हरायचे. यातून त्यांच्या मनाचे मोठेपण दिसून येतो ‘, अशा शब्दात अभिनेते नाना पाटेकर यांनी अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा करीत असलेले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना यावेळी झालेल्या जाहीर सभेतून शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या. कागल येथे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महापुरुषांच्या पुतळा अनावरण करण्यासाठी पाटेकर यांना निमंत्रित केले होते. रात्री झालेल्या समारंभात पाटेकर यांनी मनोगतात अशोक सराफ यांची आठवण काढली.

आज अशोक सराफ यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी तेथे हवे होतो,’ असा उल्लेख नाना पाटेकर यांनी केला. अशोक मामांनी माझ्यासाठी खूप काही केले, असे सांगत पाटेकर यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, ‘ त्या काळात आम्ही नाटक करीत असू. त्यांना मानधनाचे ३०० रुपये मिळायचे. तर मला ५० रुपये. नाटक संपल्यानंतर फावल्या वेळेत आम्ही पत्त्याचा डाव मांडत असू. तेव्हा अशोकमामा डाव हरत असतं. मला त्यातून पैसे मिळावेत असा त्यांचा उद्देश असायचा. नंतर मी त्यांचे डोके, पाय चेपून देत होतो, ‘ असे म्हणत या ज्येष्ठ कलाकारांची सेवा करण्याची संधी मिळाल्याचाही पाटेकर यांनी नम्रतापूर्वक उल्लेख केला.

कार्यक्रमाचे संयोजक मंत्री हसन मुश्रीफ यांनी मनोगत व्यक्त करताना महापुरुषांच्या विचारांचे महत्त्व विशद केले. त्यानंतर या नेत्याच्या अंगी अभिनेता घुसला. मंत्री मुश्रीफ यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या चित्रपटातील संवाद म्हणून दाखवले. ‘ साले अपने खुद के देश में एक सुई नहीं बना सकते.और हमारा देश तोड़ने का सपना देखते हैं ‘ हा पाकिस्तानवर संताप व्यक्त करणारा तसेच ‘ बता इस में मुसलमान का कौन सा हिन्दू का कौनसा बता? या राष्ट्रीय ऐक्यावरील मुश्रीफ यांच्या डायलॉगबाजीला पाटेकर यांच्यासह उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद नोंदवला.

त्यानंतर वेळ आली होती नाना पाटेकर यांची. ‘ महापुरुषांचे पुतळे उभारून चालणार नाही. त्यांच्या विचाराने जाण्याची गरज आहे. २५ वर्ष मुश्रीफ निवडून येतात ही साधी गोष्ट नाही. पुढच्या निवडणुकीत ते उभे आहेत असे म्हंटले तर लोक निवडून देतील. पण सत्ताधाऱ्यांनी सामान्य जनतेचे प्रश्न सोडवावेत,’ असे नेत्यांच्या शैलीत पाटेकर यांनी भाषण केल्यावर त्यालाही लोकांनी प्रतिसाद दिला. इतक्यावरच न थांबता पाटेकर यांनी मुश्रीफ यांना ‘ तुम्ही अभिनयात या, मी राजकारणात येतो; अशी टिप्पणीही केली. पाटेकर यांना (Kolhapur) काही संवाद म्हणण्याची विनंती केल्यावर त्यांनी हिंदी चित्रपटातील ‘ एक मच्छर, साला एक मच्छर इंसान को आदमी से हिजड़ा बना देता है ‘ आणि ‘ नटसम्राट ’ नाटकातील ‘ जगाव की मराव हा एकच सवाल आहे ‘ हा संवाद सादर करून बाजी मारली.

हेही वाचा : 

LPG सिलेंडर परत देताना मिळणार 500 रूपये, ग्राहकांसाठी कामाची माहिती

बावनकुळे, पटोले, वडेट्टीवारांसह १४ बड्या आमदारांना मतदानाला बंदी

लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट 3000 रुपये, दिवाळी गोड होणार