इचलकरंजी विधानसभा, महापालिका क्षेत्रातील राजकारणाचा एक वादग्रस्त पैलू पुढे आला आहे. (Ichalkaranji) त्याला पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया कारणीभूत ठरली आहे. ही निवडणूक प्प्रक्रिया सुरू असताना लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेच्या काळात ४३०.१० कोटींच्या ‘राधाकृष्ण’ पाणीपुरवठा योजनेचा डीपीआर तयार झाल्याची घोषणा आमदार राहुल आवाडे यांच्या कडून करण्यात आली.

ही घोषणा आचारसंहितेचा भंग करणारी आहे का, याची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी इचलकरंजी महापालिकेचे विरोधी पक्षनेते, शिव-शाहू विकास आघाडीचे गटनेते उदयसिंग पाटील यांनी जिल्हाधिकारी व पुुुणे येेेथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. (Ichalkaranji) दरम्यान, महापालिका परिवहन समितीतील चालक-वाहकांना नियुक्तीपत्रे व पाच हजार रुपयांचे बोनस मानधन वाटपाबाबतही आचारसंहितेच्या अनुषंगाने तपासणी करावी, अशी मागणी आणखी एक मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.२२ सप्टेंबरपासून पदवीधर मतदारसंघासाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेचा ४३०.१० कोटींचा डीपीआर तयार झाल्याची घोषणा केली होती. हा डीपीआर महापालिका सभेत ठेवून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचेही वृत्तात नमूद असल्याचे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
ही योजना आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंजूर होती की त्यानंतर प्रस्तावित झाली, डीपीआर तयार करण्यासाठी प्रशासकीय व तांत्रिक मान्यता तसेच आर्थिक तरतूद कधी करण्यात आली, याची कागदपत्रांच्या आधारे तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच घोषणेसाठी निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी घेतली होती का, पत्रकार परिषद व प्रसिद्धीसाठी शासकीय यंत्रणा अथवा सार्वजनिक निधीचा वापर झाला का, याचीही चौकशी करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. (Ichalkaranji) दरम्यान, महापालिका परिवहन समितीतील चालक-वाहकांना नियुक्तीपत्रे व पाच हजार रुपयांचे बोनस मानधन वाटपाबाबतही आचारसंहितेच्या अनुषंगाने तपासणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे
हेही वाचा :
तेरवाड येथे भरधाव डंपरची तीन दुचाकींना धडक तिघांचा मृत्यू , चौघे गंभीर