मराठी मनोरंजन विश्वाला आणखी मोठा धक्का ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मधू कांबीकर यांचे पुण्यात निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या दमदार अभिनयाने आणि लावणीच्या खास शैलीने त्यांनी अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. चित्रपटांमध्ये आई, सासू अशा विविध भूमिका साकारत त्यांनी मराठी मनोरंजनविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, एका लावणीच्या कार्यक्रमादरम्यान आलेल्या पक्षाघाताच्या झटक्यानंतर त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले.

अभिनय आणि लावणीने मिळवली लोकप्रियता मधू कांबीकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सहजसुंदर अभिनय, प्रभावी संवाद आणि लावणी सादर करण्याची खास शैली यामुळे त्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. ‘झपाटलेला’, ‘डेबू’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘माझा छकुला’ आणि ‘एक होता विदूषक’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या. चित्रपटांमध्ये त्यांनी अनेकदा आई आणि सासूच्या भूमिका साकारल्या. अभिनयासोबतच लावणीसाठी देखील त्यांचे योगदानही उल्लेखनीय होते. (Madhu Kambikar) त्यामुळे त्या केवळ अभिनेत्री म्हणूनच नव्हे, तर एक कुशल लावणी कलाकार म्हणूनही ओळखल्या जात होत्या.

लावणीच्या कार्यक्रमादरम्यान आला पक्षाघाताचा झटका २७ नोव्हेंबर २०१६ रोजी मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात ‘लावण्य संगीत’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तब्बल १२ वर्षांनंतर मधू कांबीकर या कार्यक्रमातून पुन्हा लावणी सादर करत होत्या. मात्र, कार्यक्रमादरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी जिद्दीने भैरवी सादर केली. पण, (Madhu Kambikar) त्यानंतर त्यांना मेकअप रूममध्ये त्यांना पक्षाघाताचा झटका आला. या घटनेनंतर त्यांच्या उजव्या हातावर परिणाम झाला आणि त्यांच्या प्रकृतीच्या समस्या आणखी वाढल्या.

जीवनगौरव पुरस्काराने गौरव २०१८ मध्ये झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात मधू कांबीकर यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांना सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे त्यांच्या सुनेने, शीतल जाधव यांनी त्यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. (Madhu Kambikar) त्यांच्या जाण्याने आज मराठी मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्यानंतर लावणीच्या एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

हेही वाचा : 

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी आडवा,पाणी जिरवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

नापास झालेल्या कंगना रणौतची राहुल गांधींवर टीका, नवा वाद पेटणार

कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी तत्काळ करा