इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले होते. (petrol and diesel) यादरम्यान जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती भडकताना दिसल्या. असूनही युद्ध थांबले नाही. त्यातच जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव अस्थिर झाले. तेल कंपन्या भावात वाढ करत आहेत.

इराण आणि अमेरिका युद्धात जागतिक बाजार संकटात आला. इराणवर अमेरिकेने हल्ले केले आणि जागतिक बाजारात कच्चे तेल भडकले. इराण आणि अमेरिका युद्धाची झळ जगाला बसली. तेल पुरवठा विस्कळीत झाला. भारतातही पेट्रोल डिझेलच्या किंमती झपाट्याने वाढल्या. तब्बल चार वेळा भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर भडकले. इराण आणि अमेरिका युद्धात भारतातही महागाई वाढली. अजूनही तेलाचे दर स्थिर झाले नाहीत, भारतीय तेल कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. रिलायंस ग्रुपची कंपनी जियो बीपीने किंमतीमध्ये वाढ केली.
सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे आजचे भाव जाहीर केले आहेत. जियो बीपीने रविवारी पेट्रोलच्या भावात 5 रूपयांनी वाढ केली तर डिझेलच्या भावात 3 रूपयांनी वाठ केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंजाबमध्ये पेट्रोलचा दर 108.54 आणि डिझेलचा भाव 99.19 प्रति लीटर गेला.अगोदर नायरा कंपनीने 3 ऑक्टोबर रोजी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. (petrol and diesel) त्यानंतर आता जियो बीपीनेही पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ केली. नायरा आणि जियो बीपीने वाढवलेल्या दरानंतर सरकारी तेल तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केली नाही. सरकारी तेल कंपन्यांही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्याची शक्यता आहे.
इराण आणि अमेरिका युद्धापासून सरकारी तेल कंपन्यांवर मोठा ताण आहे. सरकारी तेल कंपन्यांनी मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 7.50 प्रति लीटर वाढ केली होती. देशात एक लाखपेक्षाही अधिक पेट्रोल पंप 90 पेक्षा जास्त सरकारी तेल कंपन्यांच्या नियंत्रणात आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलरच्या आसापास गेल्या आहेत. त्यातच साैदी अरेबियाच्या जहाजावर मोठा हल्ला हूतींनी केला.त्यानंतर पुन्हा तणाव वाढला. सोमवारी ब्रेंटच्या किंमती 103.63 च्या आसपास पोहोचल्या आहेत. (petrol and diesel) आता सरकारी तेल कंपन्या नक्की किती भाव वाढ करतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. जागतिक बाजारातील तणाव कमी होणार नाही तोपर्यंत कच्च्या तेलाच्या किंमती अस्थिर राहणार आहेत. आगामी काळातील निवडणुका लक्षात घेता, अमेरिका युद्धापासून दूर राहणार आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी आडवा,पाणी जिरवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
नापास झालेल्या कंगना रणौतची राहुल गांधींवर टीका, नवा वाद पेटणार