कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुण्यात गेल्या अकरा दिवसांपासून आंदोलन सुरू होते. हे आंदोलन मागे घ्यावे (protesting) यासाठी राज्य शासनाने तुकाराम मुंढे हे कार्ड वापरले आहे. अशी विश्वसनीयता निर्माण करणारे कर्तव्य कठोर आणि चारित्र्यसंपन्न असे ते वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आहेत आणि महाराष्ट्राला ते सर्वाधिक प्रिय आहेत.

महाराष्ट्राला कर्तव्य कठोर आणि चारित्र्यसंपन्न अधिकाऱ्यांची एक परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राचे निवृत्त मुख्य सचिव अरुण भाटिया, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक अरविंद इनामदार, निवृत्त पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर, त्यांचे पती अभय बोरवणकर, अविनाश धर्माधिकारी, मुंबईचे सेवानिवृत्त जिल्हाधिकारी सुरेश साळवी, मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त जे एफ रिबेरो, सूर्यकांत जोग, अशी कितीतरी नावे वानगी दाखल देता येतील. (protesting) याच परंपरेतील तुकाराम मुंढे हे एक आहेत. 25 /26 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत वीस पेक्षा अधिक वेळा बदलीला सामोरे गेलेले तुकाराम मुंढे हे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त बनल्यानंतर त्यांनी केलेल्या धडक कारवाईमुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या गळ्यातील ते ताईत बनले आहेत.
राष्ट्रीय पातळीवरील नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणानंतर देशातील काही राज्यांमध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतल्या गेलेल्या अनेक परीक्षांचे पेपर लिक झाले. महाराष्ट्र ही प्यास अपवाद नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतल्या गेलेल्या परीक्षांचे घोटाळे पुढे आले आहेत. एकूणच देशभरातील स्पर्धा परीक्षा देऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता सध्या दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एमपीएससी प्रकरणात लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन सुरू केले होते. अकरा दिवस सुरू असलेल्या या आंदोलनात मध्यम मार्ग काढण्याचे सरकारी प्रयत्न सुरू होते.
महायुती मधील एक मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हे आंदोलन मागे घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांना या आंदोलनात लक्ष घालण्याचे सांगितले होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराची सर्वांकष चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एक व्यापक समिती गठित करण्यात आली आहे. आणि या चौकशी समितीच्या सचिव पदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी घोषणा शिवेंद्रराजे भोसले यांनी केल्यानंतर विद्यार्थ्यांचे हे आंदोलन मागे घेण्यात आले. राज्य शासनाने घेतलेल्या भूमिकेचे रोहित पवार यांनी स्वागत केले आहे.
चौकशी समिती नेमली आहे म्हणून नव्हे तर या समितीच्या सचिव पदी तुकाराम मुंढे आहेत म्हणजे चौकशी कसून होणार, कुणाचाही मुलाहिजा ते ठेवत नाहीत, इतकेच काय तर मुख्यमंत्र्यांचा दबाव सुद्धा ते मानत नाहीत. अशी त्यांची ओळख असल्यामुळे आणि त्यांच्यामुळेच एमपीएससी कारभार अतिशय सुरळीत पणे होणार असल्याची अप्रत्यक्ष ग्वाही मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचे आंदोलन थांबले आहे. एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याने अशी विश्वसनीयता निर्माण करणे हे दैव दुर्लभ आहे. तुकाराम मुंढे आहेत ना मग सर्व काही ठाकठिक होईल असे सामान्य जनतेला वाटणे हा त्या व्यक्तीचा मोठा सन्मान आहे.
चौकशी समितीच्या सचिव पदी त्यांची नियुक्ती केली गेल्यानंतर, (protesting) त्यांना अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदावरून हटवण्यात आले आहे की काय अशी एक शंका सर्वसामान्य जनतेच्या मनात होती. अर्थात हे काम केवळ दोन महिन्यांचे आहे आणि माझी बदली झालेली नाही. चौकशी समितीचे सचिव पद हे अतिरिक्त काम मला देण्यात आलेले आहे असा खुलासा तुकाराम मुंढे यांनी केल्यामुळे शंका निरसन झालेले आहे.एम पी एस सी चे अध्यक्ष विवेक भीमानवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आंदोलकांची मागणी होती मात्र अध्यक्षांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे आणि होत असलेल्या चौकशीत अध्यक्ष दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई होईलच. कारण समितीवर सचिव म्हणून तुकाराम मुंढे बसलेले आहेत.
हेही वाचा :
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रियकराकडून प्रेयसीला दरीत ढकलून खून प्रियकराला पोलीस कोठडी
पुढील 5 दिवस 5 राशींना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ सूर्य-बुध देणार साथ